मुंबईः अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या (Shivsena) दोन नेत्यांची तोफ कधी धडाडणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मेळाव्याची सुरुवात किती वाजता होईल, याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे बीकेसीवरील (BKC) भव्य मंचावर पोहोचतील. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याचं भाषण सुरु होईल.
तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यावर या सभेत 111 वेळा शंखनाद केला जाईल. बाळासाहेबांना वंदन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली जाईल.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या मेळाव्यात मंचावर ५१ आमदारांसाठी वेगवेगळ्या खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत.
मंचावर सर्वात लक्षवेधी खुर्ची असेल तरी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ठेवलेली. ही खुर्ची रिकामी ठेवली जाईल. त्यावर चाफ्याची फुले ठावली जातील.
एकनाथ शिंदे हे मंचावर आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या या खुर्चीला एकनाथ शिंदे चाफ्याच्या फुलांचा हार घालतील, असे सांगण्यात आले आहे.
आज विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजा केली जाते. शिंदे यांच्या मेळाव्यात 51 फुटी तलवारीची पूजा केली जाणार आहे. कालपासूनच सोशल मीडियावर या तलवारीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बीकेसी ग्राउंडवरील ही तलवार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Drone footage of MMRDA grounds in BKC where CM Eknath Shinde will be holding Dussehra Rally#Dussehra@mieknathshinde pic.twitter.com/DNVZCnVjrD
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) October 5, 2022
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचीही जंगी तयारी करण्यात आली आहे. शिवतीर्थावर राज्यभरातून कार्यकर्ते गर्दी करत आहेत.
शिंदे गटाचा मेळावा भव्य स्वरुपात होणार असं दिसतंय. पण उद्धव ठाकरेंचा मेळावा अत्यंत साधेपणाने करण्याचा प्रयत्न होतोय.
एकनिष्ठ दसरा मेळावा, असं या मेळावाला संबोधलं गेलंय.