सुनिल ढगे, मुंबईः माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी देवी सरस्वतीच्या (Saraswati) फोटोसंबंधी वक्तव्य केल्यानंतर त्यावर अनेकांनी आपले विचार मांडले. यापैकीच एक व्हिडिओ मी भुजबळांना पाठवला. त्यानंतर अर्ध्या तासातच मला धमक्यांचे फोन, मेसेज सुरु झाले. तुला गोळ्या झाडतो. तुझा पत्ता दे… हे लोक भुजबळांचे कार्यकर्ते असल्याचं सांगत होते, असा आरोप मुंबईतील चेंबुरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी (Lalit Tekchandani) यांनी केले आहेत.
भुजबळांनी मला धमकी दिल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा भुजबळांविरोधात FIR दाखल केलंय. त्यांनी आधी समस्त हिंदुंची माफी मागावी, अशी भूमिका ललित टेकचंदानी यांनी घेतली आहे. Tv9 शी बोलताना त्यांनी केलेले आरोप… त्यांच्याच शब्दात…
भुजबळ साहेबांनी हिंदू साधू संतांविरोधात आणि सरस्वती मातेविरोधात स्टेटमेंट केले. भाषण दिली. मी कट्टर हिंदू आहे. मला दुःख झालं. पवित्र नवरात्र सुरु आहे. आमचे उपवास सुरु आहेत. हिंदु देवी देवतांवर बोलणे, पंडितांवर बोलणे.
पंडित, साधु संतांना उलटं-सीधं बोलणं… मला खूप धक्का बसला. मी खूप लहान माणूस आहे. मी काय करु शकतो. तर एक यूट्यूबचं चॅनेल आहे. त्या लोकांनी खूप सुंदर व्हिडिओ केलेत यावर. मला ते आवडलं. मी भुजबळांना फॉरवर्ड केलं…
ते फॉरवर्ड केल्यानंतर अर्ध्या तासात एक फोन आला. आई आणि बापाच्या नावावर शिवी दिली. मला सांगितलं तुझ्या घरी घुसून तुला गोळ्या ठोकणार. मी फोन कट केला.
त्यानंतर 3 मिनिटांनी पुन्हा फोन आला. आमचं दुबई कनेक्शन आहे. दुबईतून तुला ठोकतो. परत मी फोन कट केला.
7-8 मिनिटानंतर 20-25 मेसेज आले. भ… तुझा अॅड्रेस दे, लोकेशन पाठव. घरी घुसून मारु. रस्त्यावर पाडू.
मी भुजबळ साहेबांना सांगतो, हिंदू लोकांना मुघलही मिटवू शकले नाहीत.
साहेब, तुम्ही म्हातारे झाले आहात. घरी राहून आराम करा. जेलमध्ये जाऊन आलात. खूप करप्शन केसेसमध्ये फसले आहात. हिंदूंना भडकवू नका… हिंदू पेटला ना….
तुम्ही हिंदूंची मतं घेऊन निवडून आलात. बिझनेस करून पैसे कमावला नाही. हिंदूंना दुखावू नका. हात जोडून विनंती आहे. हिंदूंची माफी मागा. आम्ही तक्रार मागे घेऊ.
भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा फोन होता, असं त्यांनी फोनवर सांगितलं. मेसेजमध्येही आम्ही भुजबळांचे कार्यकर्ते आहोत, असं सांगितल्याचं टेकचंदानी म्हणालेत.