पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असं हा तरूण सांगत होता.
भुजबळांना मारण्याची सुपारी आपल्याला मिळाली आहे. त्यांना मी उद्याच मारणार आहे, असंही या तरूणाने सांगितलं म्हटलं. त्यानंतर तपासाला वेग आला आहे.
छगन भुजबळ यांच्यावर शाईफेकनंतर जीवे मारण्याची धमकी या तरूणाने दिली आहे. आपण सांगून काम करतो, म्हणून तुम्हाला सांगतो आहे, असंही फोन करणाऱ्याने सांगितलं आहे.
मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात पुण्यातील एका तरूणाने ही धमकी दिल्याचं समोर आलं. त्या तरूणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. तसंच दोषी आढळल्यानंतर त्याला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे.
धमकी आल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात भुजबळ सध्या मुक्कामी आहेत. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. थोड्या वेळात भुजबळ पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहेत.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ हेदेखील होते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता छगन भुजबळ यांना आलेली ही धमकी गंभीर आहे. पोलिसांनीही या सगळ्याची दखल घेतली आहे.
मागच्या वर्षभरापासून राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र नुकतंच दोन जुलैला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना संधी दिली गेली. यामुळे सत्ताधारी पक्षातले नेते नाराज असल्याचं कळतं आहे. अशातच भुजबळांना आलेली धमकी गंभीर आहे.
कॅबिनेट मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. तसंच भुजबळांच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.