मुंबई | 23 जुलै 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांआधी झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आले होते. तिथे त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्याची दिलखुलास उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याच्या या मुलाखतीची राजकीय वर्तुळासह राज्यभर चर्चा झाली. याच मुलाखतीतील काही भाग देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर शेअर केले आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात त्यांना अमृता फडणवीस यांच्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी काय उत्तरं दिली? पाहुयात…
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात काही व्हीडिओ दाखवले जातात. तसं देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीस यांचा व्हीडिओ दाखवण्यात आला. यात अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यातील खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.
देवेंद्रजी यांच्याबाबत मला काय खुपतं असं विचाराल तर त्याचं मी मजेशीर उत्तर देऊ शकले असते. पण हीच संधी साधून मी एक तक्रार करणार आहे की, तुम्ही लोकांच्या सेवेत खूप व्यस्त आहात. पण स्वत:कडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. वेळी अवेळी झोपणं. कमी झोप घेणं. खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं. व्यायामासाठी वेळ न देणं या गोष्टी तुमच्या आरोग्यसाठी चांगल्या नाहीत. त्याचा दीर्घ काळासाठी तुमच्यावर परिणाम होतो. स्वत: साठी आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. आधी ते मिश्किल हसले अन् म्हणाले हे लेक्चर मी नेहमी ऐकतो. मी अमृताला नेहमी सांगतो की मी लवकरच व्यायाम वगैरे सुरी करतो. पण तसं होत नाही आणि जरी तो सुरु केला तरी फारकाळ तो टिकत नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी आणि माझी उत्तरं असं चक्रव्ह्युव नेहमी सुरूच असतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तिची मतं मला पटत नाहीत पण, तिला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
आपल्या समाजात अजूनही कितीही पुढारलेले असलो तरी, महिलांनी थेट मोकळी मतं मांडणे हे पचनी पडत नाही..
हालाँकि मैं उनके विचारों से सहमत नहीं हूँ लेकिन उन्हें विचार व्यक्त करने का पूरा अधिकार है।
अपने समाज में हम कितने भी… pic.twitter.com/W2H2UevyTJ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2023
वेळेअभावी कुटुंबाला वेळ देता येत नाही मात्र आता अमृता फडणवीस यांचा फोटो समोर आहे. त्यांना काय सांगाल. त्यांना सांगा की तुम्ही त्यांना वेळ द्याल म्हणून, असा प्रश्न ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्या फोटोकडे पाहून तीन वेळा हात जोडले.