चंद्रपूर : क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. त्याची मी उद्या पोलखोल करणार आहेच, असं सांगतानाच भाजप नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले?; असा सवालही मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या या आरोपाला आता भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ड्रग्स प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारचा प्रयत्न आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केलाय. (Sudhir Mungantiwar responds to Nawab Malik’s allegations in Mumbai drugs case)
क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपांना वाचवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार प्रयत्न करत आहे का? या प्रकरणी देशाची युवा पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपांना राजकीय संरक्षण नको, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. आरोपी हा कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे. ड्रग्स प्रकरणात संशयाचं धुकं तयार करुन त्यातून आर्यन खान याला सोडवता येईल का, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि नातेवाईंकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याबाबत विचारलं असता तपास यंत्रणांचा त्यांचं काम करुन दिलं पाहिजे. त्यांच्या कामात हस्तक्षेप नको, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
नवाब मलिक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एनसीबीला एक सवाल केला आहे. क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना 8 ते 10 लोकांना पकडले आहे असे मीडिया बाईटमध्ये सांगितले होते. खरे तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा एक अधिकारी अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.
इतर बातम्या :
परमबीर सिंग आणि वाझेही जनतेचे सेवकच होते; एनसीबीच्या समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचा पलटवार
Sudhir Mungantiwar responds to Nawab Malik’s allegations in Mumbai drugs case