“सदा सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल करा”, शिवसैनिक आक्रमक

| Updated on: Sep 11, 2022 | 1:50 PM

सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

सदा सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल करा, शिवसैनिक आक्रमक
Follow us on

मुंबई : शिंदेगटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात दादर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. तेव्हा सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसैनिकांनी (Shivsena) केली आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच हाणामार झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा एक्सक्लुझिव्ह tv9 च्या हाती लागलाय.

दरम्यान “जोपर्यंत तक्रार दाखल करून घेत नाहीत. तोपर्यंत आम्हीं इथून हटणार नाही… ठिकाण दादर पोलीस स्टेशन!”, असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे.

याप्रकरणी फिर्याद दिलेले संतोष तेलवणे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?”, असं संतोष तेलवणे म्हणालेत.काल रात्री झालेली मारहाण कश्यामुळे झाली? यावरही संतोष तेलवणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली,असं संतोष तेलवणे यांनी म्हटलं.