सत्तांतरानंतर कधीही संधी दिली नाही, कायम डावललं गेलं; शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

| Updated on: Jun 19, 2023 | 8:33 AM

Manisha Kayande Speech After inter in Shivsena : शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदे संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटावर बरसल्या; म्हणाल्या...

सत्तांतरानंतर कधीही संधी दिली नाही, कायम डावललं गेलं; शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदे यांचा ठाकरेंवर घणाघात
Follow us on

मुंबई : शिवसेना स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या नेत्या, विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पक्ष प्रवेशावेळी मनिषा कायंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात आहेत. परंतु मला या सत्तांतराच्या काळानंतर कधीही संधी देण्यात आली नाही. अनेक ठिकाणी माझे प्रश्न आहेत ते डावलले जायचे. अनेक काम मला करायचं होतं. त्यासाठी मी संधी मागत होते. परंतू ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

शिवसेना पक्षात अनेक पक्षप्रवेश होत आहेत. ते पाहून तसंच राज्याचा देखील विकास होत आहे, तो मी पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास होत असताना मला देखील विकासामध्ये यायचं होतं. म्हणून त्यासाठी मी आज निर्णय घेतला आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

अनेक लोक टीका करत आहेत. या ठिकाणी कचरा म्हणून उल्लेख करतात. परंतु माजी पर्यावरण मंत्री ना मी सांगू इच्छिते की, या कचऱ्यातूनच वीज निर्मिती होते, मोठी ऊर्जा ही निर्माण होते, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नक्कीच महिलांचे अनेक प्रश्न आहेत. ते मी या ठिकाणी मार्गी लावणार आहे. महिलांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती मी घेण्यासाठी तयार आहे. महिलांच्या, युवकांच्या प्रश्नांसाठी मी कायम आवाज उठवत राहिल, असं मनिषा कायंदे म्हणाल्यात.

ठाकरे गटाच्या फारब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे.

मनिषा कायंदे यांच्यासह मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांच्या पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.