मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची खोटक टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा हल्लाबोल देशपांडे यांनी केला आहे. (MNS leader Sandeep Deshpande criticize Shivsena and Anil Parab )
सुपारी घेतल्याशिवाय मनसे काम करु शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून असल्याचा घणाघात अनिल परब यांनी मनसेवर केला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असं सांगितलं होतं. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत बसले आहेत, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
“भाजपसोबत जाण्याचा निर्णय मनसेनं घेतला नाही. शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक चोरले. उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी मनसेला प्रस्ताव दिला होता. शिवसेनेनं धोकेबाजी केल्यामुळे त्यावेळी युती झाली नाही. शिवसेनेचा जीव महापालिका रुपी पोपटामध्ये अडकला आहे. आज ‘कृष्णकुंज’चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे”, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.
“सुपारी घेतल्याशिवाय मनसे (MNS) कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झालीच आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं नागडं केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय परिस्थिती होते ते पुढे दिसेल”, असा घणाघात अनिल परब यांनी केला आहे.
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याची मोहीमही मनसेनं हाती घेतली आहे. तर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी पोस्टरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची खिल्ली उडवली आहे.
सुपारी घेतल्याशिवाय मनसे कामच करू शकत नाही, त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून; अनिल परब यांचा घणाघात
‘असंच काम करा, आम्हाला बोलावं लागणार नाही’, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला
MNS leader Sandeep Deshpande criticize Shivsena and Anil Parab