मुंबई – महाराष्ट्रातल्या (maharasdhtra) राजकारणात (politics) बदल झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आता पालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. राज्यात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाने आत्तापासून पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत (maharashtra municipal corporation election 2022) कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 106 मध्ये यावेळी कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. कारण मागच्या पाच वर्षात तिथं शिवसेनेची सत्ता होती. राज्यातलं राजकीय समीकरणात बदल झाल्याने तिथं कोणता नगरसेवक निवडून येईल आत्ताचं सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मागच्या पाच वर्षांत तिथं शिवसेनेची सत्ता होती. सध्या महाराष्ट्रातलं राजकारण बदललं आहे. त्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येईल यावेळी पाहायला मिळेल.
मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 106 मध्ये भांडूप कॉम्प्लेक्स, विहार लेक , विणानगर, घाटीपाडा या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. तिथं मागच्यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. हर्षल केळकर हे तिथं नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी तिथं इतर पक्षांचा पराभव केला होता. भाजपचे निलाबेन सोनी, मनसेचे उमेदवार वसंत धोंडगे यांचा पराभव केला होता. मागच्या झालेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.
उद्धव-ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण सेनेचे 18 पैकी 12 खासदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. आज संभाव्य हालचाली अपेक्षित आहेत असं जवळच्या सुत्रांमी सांगितलं आहे. शिंदे यांना पाठिंबा देणारे सेनेचे 12 खासदार आज सायंकाळी 5 वाजता सभापतींची भेट घेण्याची शक्यता आहे. आज रात्री मुंबईला रवाना होण्यापूर्वी खासदार शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुन्हा राज्यात राजकीय गणिते नव्याने घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवी सत्ता स्थापन झाल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवरती होण्याची शक्यता अधिक आहे.
पक्ष उमेदवार (Candidate) विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर