BMC Election 2022: Deonar village Ward 144  – सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या देवनार गावात बाजी कोण मारणार?

| Updated on: Jul 19, 2022 | 12:42 AM

आरक्षण सोडत झाल्यानंतर सर्वसाधारण महिलासाठी हा वार्ड आरक्षित असून होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे . 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP)अनिता पांचाळ यांनी 7764 एवढी मते मिळवत ही निवडणूक जिंकली होती.

BMC Election 2022: Deonar village Ward 144  - सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या देवनार गावात बाजी कोण मारणार?
devnar village ward 144
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई- आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. आरक्षणाची सोडत झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवातही केलेले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election)नेमकी कशी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता सर्वांना आहे. मुंबई महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 144 हा देवनार गाव ( Deonar village) म्हणून ओळखला जातो. आरक्षण सोडत झाल्यानंतर सर्वसाधारण महिलासाठी हा वार्ड आरक्षित असून होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे . 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP)अनिता पांचाळ यांनी 7764 एवढी मते मिळवत ही निवडणूक जिंकली होती.   2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. मात्र यावेळी राज्य घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेचे दोन गटातील विभाजनशिवसेनेच्या मत पेटवर होताना दिसून आले आहे.

 

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

2017 चा निकाल काय सांगतो?

हे सुद्धा वाचा

रूपाली दाते- नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -1783
संगीता ढसाळ -भारिप बहुजन महासंघ -570
अश्विनी जाधव -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -४२
रोहिणी कदम -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 975
कोडक शर्मिष्ठा -अपक्ष -30
अंजली मोहिते -अपक्ष -125
अनिता पांचाळ -भारतीय जनता पार्टी -7764
शेख रुबीना -अपक्ष- 228
कामिनी शेवाळे -शिवसेना -7273
शिंदे तारा -अपक्ष -50
समीक्षा विचारे -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -2271

मतदारांची संख्या किती

या मतदारसंघाची लोकसंख्या 50हजार 326 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 5484 व अनुसूचित जमातीचे 957 नागरिक आहेत. 2017 च्या निवडणुकीत एकूण 21,603 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 492 मतदारांनी नोटाचा वापर केला होता.

वार्ड कुठून कुठपर्यंत?

या वार्डात देवनार विलेज, शिवनेरी नगर ,टेलिकॉम फॅक्टरी कॉलनी, अमर नगर, एम बी पी टी कॉलनी, न्यू मंडाला ,मानखुर्द गाव ,बीएसएनएल टेलिकॉम फॅक्टरी, इत्यादी परिसरांचा समावेश होतोसरांचा समावेश होतो.