मुंबई : मुंबई महापालिकेत (BMC Election 2022) कुणाचा विजयी झेंडा फडकणार, याकडे सगळ्यांचं बारीक लक्ष लागलेलं आहेच. अशातच वॉर्ड नंबर 129 हा देखील महत्त्वाच्या वॉर्ड पैकी एक. या वॉर्डमध्ये (Ward No. 129) कोण बाजी मारतं, याचीही उत्सुकता असणार आहे. 2017 साली पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारानं आझाद नगरमध्ये (Azad Nagar) मोडणाऱ्या या वॉर्डमध्ये विजय मिळवला होता. शिवसेना आणि भाजप या दोन उमेदवारांमध्ये मुंबई पालिकेच्या 129 नंबरच्या वॉर्डमध्ये रंगतदार लढत झाली होती. अवघ्या दोनशे मतांच्या फरकाने भाजप उमेदवाराचा 2017 मध्ये विजय झाला होता. आता येत्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 129 मध्ये नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर जाणून घेऊयात 129 नंबरच्या वॉर्डमध्ये नेमकं काय घडलेलं आहे? या वॉर्डमध्ये नेमकं कोणकोणता भाग मोडतो आणि इथली नेमकी रचना काय आहे? नव्या वॉर्ड आरक्षणानुसार आणि रचनेनुसार या प्रभागाचा आढावा घेऊयात..
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | प्रदीप बबन मांडवकर | 6712 |
भाजप | गवळी सूर्यकांत जयहरी | 6927 |
राष्ट्रवादी काँग्रेस | खान रोशन हारुन | 4962 |
काँग्रेस | अर्चना प्रद्युम्न वाघमारे | 1946 |
मनसे | ||
अपक्ष / इतर | नंदू मोरे | 591 |
नोटा 329
एकूण मतं 22,200
विजयी उमेदवार – सूर्यकांत जयहरी गवळी, भाजप
चिराग नगर, आझाद नगर, मनेकलाल इस्टेट