मुंबई – पालिकेच्या निवडणुकीत (maharashtra municipal corporation election 2022) मोठं राजकारण (Politics) पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण सध्याचं राजकारण पाहता महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळे होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत त्यावर परिणाम होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील महापालिका सध्या शिवसेनेच्या (Shivsena) हातात आहे. पण येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पालिकेवरती शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्हे कमी असल्याची सुध्दा चर्चा आहे. त्यामुळे आत्तापासून अनेक पक्षांनी आपली मोट बांधायला सुरुवात केली आहे. भाजप आणि शिंदे गटाने युती केल्याने त्यांचं पारड जड असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गट यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. 12 खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आणखी कोणते नेते शिंदे गटात सामील होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगर पालिका निवडणूक वॉर्ड 105
मुंबई महानगर पालिका निवडणूक वॉर्ड 105 , संतोष नगर, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा बस डेपो, ओ.एन.जी.सी. कॉलनी इत्यादी परिसराचा त्या वॉर्डमध्ये समावेश होतो. मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय घाडी यांनी त्यावेळी तिथं अधिक मतं घेऊन बाजी मारली होती. त्यावेळी भाजपचे मोतीभाई देसाई , मनसेचे उमेदवार विमोल मयेकर यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत आहेत. पहिली हातून सत्ता गेली, तर आता पक्ष वाचवण्याची धडपड सुरू आहे. ज्यामध्ये रोज नवा ट्विस्ट येत आहे. आता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे गटाने जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाला तूर्तास हात लावलेला नाही. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या उपनेतेपदी यशवंत यादव गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंखे, तानाजी सावंत, विनय नाहाटा, शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पक्ष उमेदवार (Candidate) विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर