मुंबईः BMC Election2022 | ward 47 | मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) पडघम वाजू लागलेत. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेली मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होत आहे. भाजप आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचा गड (ShivSena) समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर यंदा भागवा फडकणार का, याचं उत्तर येत्या काही महिन्यात मिळेलच. प्रत्येक वॉर्डनिहाय निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. वॉर्ड क्रमांक 47 मधील मतदारही कुणाला मतदान करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2017 च्या निवडणुकीत या वॉर्डावर भाजपने सत्ता मिळवली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारत जया सतनामसिंग तिवाना (Jaya Satnamsingh Tiwana) यांनी नगरसेवक पदाची खुर्ची पटकावली होती. आता आगामी निवडणुकीत भाजपला आपलं पद टिकवून येईल का? की वेगळी राजकीय गणितं आखून शिवसेना या जागेवर भगवा फडकवेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काँग्रेस पक्षाचाही प्रभाव या मतदारसंघावर आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशा तीन पक्षात चुरशीची लढत होण्याची चिन्ह आहेत.
2017 मध्ये या मतदार संघातून भाजपच्या श्रीमती जया सतनामसिंग तिवाना यांनी निवडणूक जिंकली होती. काँग्रेसच्या पिंकी भाटियांना टक्कर देत त्यांनी नगरसेवक पदाची खुर्ची पटकावली होती.
काच पाडा, एव्हर शाईन नगर, गोरेगाव स्पोर्ट क्लब परिसर ही प्रमुख ठिकाणं वॉर्ड क्रमांक 47 मध्ये येतात.
नहारनगर, भंडारवाडा मार्ग, चिंचोली बंदर रोड, न्यू लिंक रोड, एमडीपी रोड, पोईसर नदी, एव्हरशाईन नगर, अटलांटा इमारत, न्यू लिंक रोड, फादर जस्टीन रोड, चुन्नीलाल गिरीधारी लाल पटेल मार्ग आदी भाग या वॉर्डात समाविष्ट होतो.
यंदा मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, त्यानुसार वॉर्ड क्रमांक 47 हा खुल्या प्रवर्गातून निश्चित करण्यात आला आहे.
2011 मधील जनगणेनुसार, वॉर्ड क्रमांक 47 मधील एकूण लोकसंख्या 51 हजार 438 एवढी आहे. तर 2,347 एवढी अनुसुचित जाती व 393 ही अनुसुचित जमातीतील लोकांची संख्या आहे.
महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)
पक्ष (Party) | उमेदवार (Candidate) | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | जया सतनामसिंग तिवाना | विजयी उमेदवार |
काँग्रेस | पिंकी भाटिया | - |
शिवसेना | सुप्रिया विजय पवार | - |
मनसे | शीतल चौधरी | - |
राष्ट्रवादी काँग्रेस | पूजा होनावार | - |
अपक्ष/ इतर | - | - |