मुंबई – मुंबई महापालिकेचा वॅार्ड क्रमांक 3, नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर चेक नाका (Dahisar checknaka) परिसर, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या मोठ्या परिसराचा त्यामध्ये समावेश होतो मागच्या पाचवर्षात तिथं शिवसेनेचा नगरसेवर राहिला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाने तिथं योग्य कामे केली नसल्याची विरोधकांची ओरड आहे. त्यामुळे तिथं यंदाच्या निवडणुकीत (Election) काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही. पालिकेची निवडणुक यावर्षी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या तिथल्या उमेदवारांनी आत्तापासून पक्षाच्या मागे लागून तिकीट फायनल करण्याचं काम चालू आहे.
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळकृष्ण बिद्र यांनी इतर उमेदवारांचा पराभव केला होता. भाजपचे सागर बलिघरे आणि काँग्रेसच्या अभयकुमार चौबे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. भाजप आणि शिवसेना त्यावेळी वेगळी लढली होती. त्यामुळे नेमकं कोण विजयी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. पण शिवसेनेच्या उमेदवाराने त्यावेळी सगळ्यांना चकीत करून बाजी मारली होती. सध्या तिथं अलबेल चित्र आहे. नेमकं कोण विजयी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तसेच मी काय करू शकतो हे सांगण्यात इच्छूक उमेदवारांची स्पर्धा लागली आहे.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये 39083 मागच्या निवडणुकीच्यावेळी मतदान होतं. त्यापैकी 23656 मतदारांनी मतदान केलं.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर, चेक नाका परिसर, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या मोठ्या परिसराचा त्यामध्ये समावेश होतो