मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणूक रणधुमाळीत वॉर्ड क्रमांक 198चा आढावा घेऊ या. या वॉर्डात मागील वेळी म्हणजेच 2017च्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले ते शिवसेनेने. तर मनसेने शिवसेनेला (MNS-Shivsena) टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेच्या उमेदवाराचा याठिकाणी पराभव झालेला पाहायला मिळाला. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) हा एक महत्त्वाचा प्रभाग असून याठिकाणी मफतलाल मील त्याचप्रमाणे सन मील आदी परिसर येतात. जवळपास सहा उमेदवारांनी याठिकाणी आपले नशीब आजमावले होते. प्रमुख पक्षांसह दोन अपक्ष निवडणूक रिंगणात होते. शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक तेरा हजारांवर तर सर्वात कमी मते अपक्षाला सव्वाशेवर मिळालेली पाहायला मिळाली. आता यावेळी बाजी कोण मारणार, शिवसेना की मनसे की आणखी तिसरा कोणी, याची उत्सुकता आहे.
स्नेहल सूर्यकांत आंबेकर (शिवसेना) – 13,614
कुणाल रमेश कदम (रिपाइं) – 1720
संजय शंकर कांबळे (काँग्रेस) – 1598
विनायक (बंटी) म्हशीलकर (मनसे) – 8088
रामचंद्र सिताराम नारकर (अपक्ष) – 123
मकरंद श्रीधर तासगांवकर (अपक्ष) – 964
शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांचा याठिकाणी विजय झाला होता. 13 हजारांवर मते त्यांनी मिळवली होती. या वॉर्डात एकूण 49,547 मतदार असून 26,326 वैध मते प्राप्त झाली. एक मत अवैध म्हणून गणले गेले. तर नोटाला 964 मते मिळाली होती. अपक्षांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा नोटाला मिळालेली मते अधिक होती. म्हणजेच याठिकाणच्या नागरिकांनी अपक्षांना पूर्णपणे नाकारल्याचे पाहयला मिळाले. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी दोघांवर गुन्हेगारी स्वरुपाच्या केसेस असल्याचे नमूद आहे.
सन मील लेन, मफतलाल मील, लोअर परेल (पश्चिम), वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप, धुरू वाडी, गांधी नगर, एनएम जोशी पोलीस स्टेशन