BMC Election 2022 : शिवसनेचा बालेकिल्ला असणाऱ्या 203 नंबरच्या वार्डात भाजपा करणार का घुसखोरी? यंदाच्या निवडणुकीत वेगळे असे काय?

| Updated on: Jun 17, 2022 | 2:01 PM

2017 च्या निवडणुकीमध्ये या वार्डात 28 हजार 722 मते ही वैध ठरली होती. मतदारांची संख्या अधिक असल्याने या वार्डात अपक्षांचा कधी बोलबाला राहिलाच नाही. लढत झाली ती मुख्य पक्षांमध्येच. गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनच्या उमेदवारासमोर भाजपा, मनसे आणि कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान होते. असे असले तरी शिवसेनेच्या मसुरकर सिंधू यांनी तब्बल 5 हजार मतांनी विजय खेचून आणला होता. भाजपाच्या तेजस्विनी आंबोले यांचा त्यांना पराभव केला होता.

BMC Election 2022 : शिवसनेचा बालेकिल्ला असणाऱ्या 203 नंबरच्या वार्डात भाजपा करणार का घुसखोरी? यंदाच्या निवडणुकीत वेगळे असे काय?
मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई :  (Politics) राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. (Mumbai Corporation) मुंबई महापालिकेत 2 नंबरचा पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे तर मुंबई महापालिकेवर आजही भगवा फडकत आहे. 2017 च्या निवडणुकीत लक्षवेधी ठरली ती महापालिकेतील नगरसेवकांची आकडेवारी. भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या संख्येत फार मोठी तफावत नसली तरी यंदाच्या (Election) निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरच सर्वकाही अवलंबून आहे. वार्ड क्र. 203 मध्ये शिवसेनेच्या मसुरकर सिंधू रविंद्रनाथ यांचा विजय झाला होता. त्यांनी भाजपाच्या उमेदवार तेजस्विनी आंबोले यांचा परभव केला होता. मोठ्या मताधिक्याने हा विजय मसुरकर सिंधू यांनी मिळवला असला तरी गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे ही बदलेली आहेत. त्यामुळे याचा नेमका परिणाम काय होणार हे पहावे लागणार आहे. या वार्डामध्ये प्रमुख पक्षात खरी लढत असली तरी यंदाचा दावेदार कोण राहणार हे पहावे लागणार आहे.

कशी आहेत राजकीय समीकरणे?

2017 च्या निवडणुकीमध्ये या वार्डात 28 हजार 722 मते ही वैध ठरली होती. मतदारांची संख्या अधिक असल्याने या वार्डात अपक्षांचा कधी बोलबाला राहिलाच नाही. लढत झाली ती मुख्य पक्षांमध्येच. गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनच्या उमेदवारासमोर भाजपा, मनसे आणि कॉग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान होते. असे असले तरी शिवसेनेच्या मसुरकर सिंधू यांनी तब्बल 5 हजार मतांनी विजय खेचून आणला होता. भाजपाच्या तेजस्विनी आंबोले यांचा त्यांना पराभव केला होता. आता समीकरणे बदलत असून यंदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनामसुरकर सिंधू रविंद्रनाथ
भाजपआंबोली तेजस्विनी नाना
राष्ट्रवादी काँग्रेसभारती जगन्नाथ
काँग्रेसजाधव मारुती जगन्नाथ
मनसेदुर्गावाले पुनम अरुण
अपक्ष / इतर

अपक्ष उमेदवारापेक्षा मतदारांची नोटाला पसंती

वार्ड क्र. 203 मध्ये खरी लढत ही मुख्य पक्षांच्या उमेदवारामध्येच राहिलेली आहे. गतवेळी केवळ बाबरे रेश्मा सुधीर यांनी नशीब आजमावले होते पण मतदारांनी त्यांना नाकारले असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. कारण त्यांना केवळ 262 मते मिळाली होती तर नोटाला अर्थात एकही उमेदवार पसंत नाही याची 618 जणांनी पसंती दिली होती. त्यामुळे मतदारांची संख्या अधिक असलेल्या या वार्डात अपक्षांकडे मतदारांनी दुर्लक्ष केलेले आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहे मतांचे समीकरण

>> आंबोली तेजस्विनी नाना (भारतीय जनता पार्टी) – 9622

>> बाबरे रेश्मा सुधीर (अपक्ष)- 262

>> दुर्गावाले पुनम अरुण (मनसे)- 2061

>> जाधव मारुती जगन्नाथ (कॉंग्रेस)- 1497

>> मसुरकर सिंधू रविंद्रनाथ (शिवसेना)- 14,540

>>  जाधव भारती जगन्नाथ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)- 122

>> नोटा- 618