maharashtra municipal corporation election 2022 : प्रभाग क्रमांक 133 मध्ये पुन्हा मनसे बाजी मारणार का ?, इच्छूक उमेदवारांची यादी वाढली

| Updated on: Jul 19, 2022 | 7:46 PM

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परमेश्वर कदम यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना उमेदवार सचिन गायकवाड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

maharashtra municipal corporation election 2022 : प्रभाग क्रमांक 133 मध्ये पुन्हा मनसे बाजी मारणार का ?, इच्छूक उमेदवारांची यादी वाढली
BMC Ward 133
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई मुंबई महापालिकेच्या (maharashtra municipal corporation election 2022) निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. परंतु सध्या महाराष्ट्रात राजकारण (Politics) एका वेगळ्या लेवलवरती आहे. महाविकास आघाडीची (MVA) सत्ता गेल्यापासून पालिका कोणाच्या ताब्यात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आत्तापासून अनेक पक्षांनी आपली मतदारांसाठी आत्तापासून फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेमकी सत्ता कोणाची येणार ? पालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार हे देखील पाहावं लागणार आहे.

प्रभाग क्रमांक 133 मध्ये नव्या प्रभागरचनेनुसार एस. जी. बर्वेनगर, राजीनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मागच्या पाच वर्षाच तिथं मनसेचा नगरसेवक होता. मागच्या पाच वर्षात त्यांनी तिथं काय काम केलं हे निवडणुकीच्या प्रचारात समजेल. पण मागच्या झालेल्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांने इतर पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केलं होतं.

हे सुद्धा वाचा

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परमेश्वर कदम यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना उमेदवार सचिन गायकवाड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. काँग्रेस पक्षाकडून ब्रिजमोहन शर्मा यांना उमेदवारी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वॉर्डमध्ये धुमाळ बापू यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपकडून या वॉर्डमध्ये एकदी उमेदवार नव्हता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते.

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना उत आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिवसेनेतून नेत्यांची पलायन दिवसेंदिवस सुरू आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर अडीच वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा एकही आमदार जिंकला नसता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात पुन्हा सामील होण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. शिंदे गुवाहाटीमध्ये असताना मी प्रयत्न केला होता. माझे आणि माझ्या मुलाचे राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील कदम यांनी सांगितले. पण तरीही मी गप्प आहे. माझा काय दोष माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी बोलणार नाही, म्हटलं तर दोन भूकंप होतील.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर