मुंबई : मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि निवडणुकीचे आरक्षण (Reservation) जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. मागील म्हणजेच 2017च्या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वत:ला आजमावले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी चौरंगी तर पंचरंगी निवडणुका पाहायला मिळाल्या. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत यावेळी काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या वॉर्ड क्र. 45मध्येही पंचरंगी निवडणूक झाली होती. याठिकाणी काँग्रेस, मनसे, शिवसेना, भाजपा तसेच रिपाइं असे पक्ष या वॉर्डात लढले. यात भाजपाचे रामनारायण बारोट (Ram Barot) विजयी झाले होते. मात्र, मागील वर्षी 26 सप्टेंबर 2021ला त्यांचे निधन झाले. 1992पासून डॉ. बारोट सलग सहावेळा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून येत होते. त्यांनी मुंबई महापालिकेत उप महापौरपदासह सुधार समिती, शिक्षण समिती आणि आरोग्य समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.
वॉड 45मध्ये भाजपाचे राम बारोट विजयी झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र नंदकुमार काळे शिवसेनेतर्फे, रमेश अरविंद यादव काँग्रेसतर्फे, निलेश शांताराम मुद्राळे मनसेतर्फे तर श्रीधर शंकर कन्नुरे रिपाइंतर्फे लढले होते. दरम्यान, बारोट यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक झालेली नाही.
– राम नारायण बारोट – 16,407
– राजेंद्र नंदकुमार काळे – 5609
– श्रीधर शंकर कन्नुरे – 95
– निलेश शांताराम मुद्राळे – 406
– रमेश अरविंद यादव – 2930
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
याठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली असून शिवसेनेचे राजेंद्र काळे दुसऱ्या तर काँग्रेसटे रमेश यादव तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी आता मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतो, त्याची उत्सुकता आहे.
2022मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्र. 45 सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणाहून भाजपासह शिवसेना तसेच इतर पक्ष कोणाला उमेदवारी देतात, ते पाहावे लागेल.
महिंद्रा नगरस गोविंद गार्डन नगर, मनोहरलाल देसाई रुग्णालय परिसर