BMC Election 2022 Wadarpada Ward 28 : काँग्रेसला पुन्हा सरप्राईज मिळणार की? वॉर्ड नंबर 28 मध्ये राजपती यादव यांचा मार्ग कठीण?

| Updated on: Jun 07, 2022 | 7:21 PM

हा वॉर्ड आणि BMC मधील काँग्रेस नगरसेवक राजपती यादव (RAJPATI YADAV) यांचे पद गेल्यावेळी रद्द केल्यानंतर न्यायालयाने शिवसेनेचे एकनाथ हुंदरे यांना प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक म्हणून घोषित केले. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती.

BMC Election 2022 Wadarpada Ward 28 : काँग्रेसला पुन्हा सरप्राईज मिळणार की? वॉर्ड नंबर 28 मध्ये राजपती यादव यांचा मार्ग कठीण?
वॉर्ड नंबर 28 मध्ये राजपती यादव यांचा मार्ग कठीण?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकच्या निवडणुकीने (BMC Election 2022) सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईच्या कांदिवलीतील वडारपाड्यातील वॉर्ड क्रामांक 28 हा (Wadarpada Ward 28) कायम सरप्राईजिंग राहिला आहे. कारण या ठिकाणी निवडणूक आलेल्या नगरसेवकाला आपलं पद गमवावं लागलं होतं. त्यामुळे काँग्रेसचं पारडं या ठिकाणी रिकामच राहिलं होतं. हा वॉर्ड आणि BMC मधील काँग्रेस नगरसेवक राजपती यादव (RAJPATI YADAV) यांचे पद गेल्यावेळी रद्द केल्यानंतर न्यायालयाने शिवसेनेचे एकनाथ हुंदरे यांना प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक म्हणून घोषित केले. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती. 5 एप्रिल 2019 रोजी जात तपासणी समितीने बनावट प्रमाणपत्रामुळे राजपती यादव यांचे नगरसेवक पद रद्द केले. त्यामुळे काँग्रेसला हा गड काबीज करूनणही मोठा दणका बसला होता.

निवडणुकीत काँग्रेसला 8 हजारांपेक्षाही जास्त मतं

राजपती यादव – काँग्रेस- 8241

एकनाथ हुंडारे – शिवसेना- 4608

किरण साळुंके – भाजप – 4572

बाळकृष्ण पालकर- मनसे – 923

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

जात प्रमाणपत्रामुळे दणका

अशी मतं गेल्या निवडणुकीत उमेदरांना मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष लागलेलं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी बीएमसीच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसचे उमेदवार राजपती यादव यांना 8200 तर शिवसेनेचे उमेदवार एकनाथ उर्फ ​​शंकर हुंदरे यांना 4608 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजपती यादव यांना विजयी घोषित केले, मात्र हुंदरे यांनी राजपती यादव यांच्या बनावट प्रमाणपत्राची तक्रार जात चौकशी समितीकडे केली असता न्यायालयाने राजपती यादव यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळले. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला राजपती यादव यांनी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, पण तेथूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली.

दुसऱ्या वॉर्डमध्येही असाच प्रकार घडलेला

यावेळी स्मॉल कॉज कोर्टाने एकनाथ उर्फ ​​शंकर हुंदरे याला विजयी घोषित केले. या संदर्भात 76/2017 च्या निवडणूक याचिकेवर न्यायाधीश महाले यांनी सुनावणी घेतली. याआधीही मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 76 मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन मुरजी पटेल यांच्या जागी काँग्रेसचे नितीन बंडोपंत सलागरे यांची स्मॉल कॉज कोर्टाने नवीन नगरसेवक म्हणून घोषणा केली होती.