BMC Election 2022 Gulmohar Colony Juhu (Ward 69) आघाडी झाल्यास भाजपाचा विजय अशक्य, काँग्रेसला होणार फायदा

| Updated on: Jun 08, 2022 | 2:45 PM

मुंबई महापालिकेच्या वार्ड क्रमांक 69 मध्ये 2017 ला भाजपाच्या रेणू हंसराज आणि काँग्रेसच्या भावना जैन यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या लढतीमध्ये भाजपाच्या उमेदवार रेणू हंसराज यांनी बाजी मारली.

BMC Election 2022 Gulmohar Colony Juhu (Ward 69) आघाडी झाल्यास भाजपाचा विजय अशक्य, काँग्रेसला होणार फायदा
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वार्ड क्रमांक 69 मध्ये गुलमोहर कॉलनी, डीएन नगर, चार बंगला आणि मुन्सी नगर या प्रमुख भांगाचा समावेश होतो. 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत (BMC Election) या वार्डामधून भाजपाच्या (bjp) रेणू हंसराज (Renu Hansraj) यांनी बाजी मारली होती. या वार्डात अपक्ष उमेदवारांसह एकून नऊ उमेदवार उभे होते. वार्ड क्रमांक 69 मध्ये भाजपाच्या रेणू हंसराज आणि काँग्रेसच्या भावना जैन यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या निवडणुकीत रेणू हंसराज यांनी काँग्रेसच्या उमेदवार भावना जैन यांना पराभूत करत बाजी मारली. या निवडणुकीत रेणू हंसराज यांना एकूण 8266 मते पडली तर काँग्रेसच्या भावना जैन यांना 4561 मतांवर समाधान मानावे लागले. या वार्डामधून काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांनी आपला उमेदवार उभा केला होता.

एक नजर आकड्यावर

वार्ड क्रमांक 69 मध्ये अपक्ष उमेदवारांसह एकूण 9 उमेदवारांनी मागच्या निवडणुकीत आपले नशिब अजमावले. यामध्ये भाजपच्या रेणू हंसराज यांनी बाजी मारली, त्यांना एकूण 8266 मते पडली. तर काँग्रेसच्या भावना जौन यांना 4561 मते पडली. शिवसेनेच्या उमेदवार अंजली बाळा पालकर यांना 3833 मते मिळाली. मनसेच्या नयना पल्लर यांनी या निवडणुकीत एकूण 1092 मते घेतली. तर या निवडणुकीत अन्य पाच अपक्ष उमेदवार देखील उभे होते.

एकूण मतदार संख्या

वार्ड क्रमांक 69 मध्ये एकूण 37718 इतके मतदान आहे. त्यामध्ये गेल्या निवडणुकीत 18506 मतदान वैध ठरले. भाजपाच्या रेणू हंसराज यांनी 8266 मते मिळवत बाजी मारली. तर या वार्डात काँग्रेस दोन नंबरचा पक्ष ठरला. काँग्रेसच्या उमेदवार भावना जौन यांना 4561 मते पडली. तीन नंबरला शिवसेना तर चार नंबरला मनसेचा उमेदवार होता.

हे सुद्धा वाचा

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

या वार्डामध्ये डीएन नगर, चार बंगला मुन्सी नगर आणि गुलमोहर कॉलनी या प्रमुख विभागांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

यंदा काँग्रेस आणि भाजपामध्ये चूरस

2017 साली पार पडलेल्या महापालिका मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, वार्ड क्रमांक 69 मध्ये भाजपाच्या उमेदवार रेणू हंसराज आणि काँग्रेसच्या उमेदवार भावना जौन यांच्यात थेट सामना होता. या निवडणुकीत भावना जैन यांनी बाजी मारली. मात्र सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. या सरकारमधील काँग्रेस एक घटक पक्षा आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडीमुळे मतांचे समिकरण बिघडले तर या वार्डात विजय मिळवणे भाजपासाठी अवघड काम होऊ शकते.