मुंबई : (Mumbai) मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वच प्रमुख पक्ष हे दावेदार आहेत. त्यामुळे दरवेळी या प्रभागावर लक्ष केंद्रीत असते. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे तर दोन नंबरचा पक्ष म्हणून भाजपाने आपली ओळख निर्माण केली आहे. असे असले तरी 2017 च्या (BMC Election) निवडणुकीत या प्रभागात (Congress) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या श्वेता शरद कोरेगावकर यांनी बाजी मारली होती. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या प्रभागामध्ये काहीही होऊ शकते हे येथील मतदारांनी दाखवून दिले आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षात रस्सीखेच झाली असली तरी 2069 मतांनी श्वेता शरद कोरेगावकर यांनी बाजी मारली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीने राजकीय समीकरणे बदलली असून याचा नेमका फायदा कुणाला होणार हे पहावे लागणार आहे.
प्रभाग क्र. 9 मध्ये खरी लढत ही प्रमुख पक्षांमध्ये झाली असली तरी कॉंग्रेसच्या श्वेता कोरेगावकर यांना त्याच्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा मोठा फायदा झाला होता. राष्ट्रवादीचा उमेदवार या जागेसाठी उभा नव्हता. त्यामुळे मताचे विभाजन तर झाले नव्हते शिवाय एकीचा फायदा त्यांना झाला होता. त्यानंतर गेल्या 5 वर्षात येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपा असे स्पष्ट चित्र असले तरी वैशिष्ट्यपूर्ण प्रभागात नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे. 2017 सालच्या निवडणुकीत मनसेने ही जागा लढवली होती. यामध्ये मनसे विजयाच्या कोसो मैल दूर राहिली असली तरी क्रमांक 1 च्या आणि 2 नंबरच्या उमेदवारातील मताधिक्य ठरविण्यामध्ये महत्वाचा रोल निभावू शकते हे मात्र नक्की.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
या प्रभागामध्ये कॉंग्रेसच्या श्वेता कोरेगावकर या 2 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. असे असले तरी दोन नंबरसाठी शिवसेनेचे सचिन म्हात्रे आणि भाजपाचे मोहन मिठबावकर यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. सचिन म्हात्रे यांना 7363 मते मिळाली होती मोहन मिठबावकर यांना 7585 मते मिळवता आली होती. 222 मते ही भाजपाचे मोहन मिठबावकर यांना अधिक होती.त्यामुळे तीन नंबरच्या उमेदवाराला जी मते मिळतात त्यावरच येथील क्रमांक 1 च्या उमेदवराचे भवितव्य अवलंबून आहे.
मगासवर्गासाठी राखीव असलेल्या या 9 नंबर प्रभागामध्ये कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसे मध्येच लढत झाली होती. एकही अपक्ष 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभा नव्हता. तर नोटाला 485 मतदारांनी पसंती दिली होती. त्यामुळे गोरेगाव पगोडा भागातील मतदार यंदा नेमकी बाजू पाहून पाहून कुणाला झुकते माप देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
<< श्वेता शरद कोरेगावकर (कॉंग्रेस)-9654
<< सचिन दामोदर म्हात्रे (शिवसेना)- 7363
<< मोहन मिठबावकर (भाजपा)- 7585
<< महेश लक्ष्मण नर (मनसे)-1248
<< नोटा – 485