मुंबई : महापालिकेच्या वार्ड क्रमांक 70 मध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो. वार्ड क्रमांक 70 मध्ये 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाच्या (BJP) उमेदवार सुनिता राजेश मेहता (Sunita Rajesh Mehta) या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या विणा विरेंद्र टॉक याचा पराभव केला. सुनिता मेहता यांना या निवडणुकीत एकूण 13034 मतं पडली तर शिवसेनेच्या (Shiv Sena) विणा टॉक यांना 3760 मते मिळाली होती. या वार्डामध्ये काँग्रेसच्या उमेदवार बिनिता मेहुल वोरा या 3478 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. वार्ड क्रमांक सत्तरमधून भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी अशा जवळपास सर्वच पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता.
वार्ड क्रमांक सत्तरमध्ये अपक्ष उमेदवारांसह एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, युनायटेड काँग्रस पार्टी अशा सहा पक्षांनी तर तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपाच्या सुनिता मेहता यांनी बाजी मारली सुनिता मेहता यांना 13034 मते मिळाली, शिवसेनेच्या विणा टॉक यांना 3760 तर काँग्रेसच्या उमेदवार बिनिता मेहुल वोरा या 3478 मते मिळाली. या निवडणुकीत मनसेच्या उमेदवार रश्मी रविंद्र येलंगे यांना 2076 मतांवर समाधान मानाव लागलं. राष्ट्रवादीच्या उमेदवार स्मिता परेरा यांना तर अवघी 158 मते पडली. युनायटेड काँग्रेस पार्टीच्या उमेदवार संध्या सूर्यकांत सावंत यांना 88 मते पडली. या प्रमुख पक्षांसोबतच अन्य तीन अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढवली होती.
वार्ड क्रमांक सत्तरमध्ये एकूण मतदारांची संख्या 42200 इतकी आहे. त्यापैकी 22784 वैध मतदान झाले. या वार्डामधून भाजपाच्या सुनिता मेहता यांनी 13034 मतांसह बाजी मारली.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
वार्ड क्रमांक 70 मध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो.
2o17 साली वार्ड क्रमांक 70 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या मतदान आकडेवारीवर नजर टाकल्यास इथे भाजपाची बाजू अधिक मजबूत वाटते. भाजपाच्या उमेदवार सुनिता राजेश मेहता यांना एकूण 13034 मते पडली होती. या मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास एकूण मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान हे भाजपाला झाले होते. तर उर्वरीत पन्नास टक्के मतदान मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना झाले. त्यामुळे या वार्डामधून पुन्हा एकदा भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची अधिक शक्यता वाटते.