मुंबई- राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आरक्षणाच्या सोडतीनंतर राजकीय पक्षांनी आपल्या मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्तांतराचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? कोण आपले वर्चस्व सिद्ध करणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मुंबई महानगरपालिकेतील(BMC Election) वार्ड क्रमांक 20 हा गणेश नगर वॉर्ड म्हणून ओळखला जातो. या वार्डामध्ये 2017 च्या निवडणुकीत, भारतीय जनता पार्टीचे (BJP)दीपक तावडे यांनी 6856 मते मिळवत निवडणूक जिंकली होती. मात्र 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांना आपल्या अस्तित्व टिकवून ठेवता येणार का? याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात एमआयएम, समाजवादी पार्टी, काँग्रेस, मनसे, अपक्ष, बहुजन विकास आघाडी, यासारखे अनेक पक्षांनी निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे यावेळी नेमकी कोण मैदानात उतरणार ?कुणाची युती होणार आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील बदललेले राजकिय वातावरण , शिवसेनेत पडलेली फूट या सगळ्यचा फायदा नेमका कुणाला होणार ? शिवसेनेतून बाजूला निघालेला एकनाथ शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवणार असल्याचे सद्यस्थितीला दिसत असले तरी मतदार कुणाच्या बाजूने उभे राहणार हे महत्वाचे आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस, | ||
राष्ट्रवादी , | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
आजमा शमीम – एमआयएम- 414
चौधरी मोहम्मद – समाजवादी पार्टी – 1627
दुबे लालजी गजानन- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 934
कोकणे अनिल हरिश्चंद्र – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – 9
कदम राजेंद्र – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 886
खान युसुफ मोहम्मद – अपक्ष – 423
मोहम्मद अझरुद्दीन- बहुजन विकास आघाडी- 143
मिश्रा कृष्णा – अपक्ष- 43
पाटील विनायक- नॅशनल काँग्रेस पार्टी – 2017
शेख मन्सुरी फत्तेमोहम्मद – अपक्ष- 82
सुर्वे सुधाकर- शिवसेना – 4360
दीपक तावडे – भारतीय जनता पार्टी- 656
उस्मानी मकसूद – अपक्ष- 65
यादव विजय शंकर – बहुजन समाज पार्टी- 100
या वार्डाचे एकूण लोकसंख्या 58,286 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 1504 व अनुसूचित जमातीचे 331 नागरिक आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 18 163 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर 184 नागरिकांनी नोटाचा वापर केला होता.
या वार्डात सह्याद्री नगर, गणेश नगर व बंदर पाकळी या परिसरांचा समावेश होतो.