BMC Election 2022 Worli Ward 196 | वरळीत भगव्याची एकहाती सत्ता, यंदाही विरोधकांना धूळ चारणार का? काय आहे वॉर्ड 196 चं समीकरण?

| Updated on: Jun 17, 2022 | 2:00 PM

मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा मागील वेळच्या तुलनेत अनेक बदल झाले आहेत. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 196 हा सर्वसाधारण गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच हा वॉर्ड महिलांसाठीही आरक्षित करण्यात आला आहे.

BMC Election 2022 Worli Ward 196 | वरळीत भगव्याची एकहाती सत्ता, यंदाही विरोधकांना धूळ चारणार का? काय आहे वॉर्ड 196 चं समीकरण?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

BMC Election 2022 ward 196| मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मनपाने प्रभाग रचना जारी करून आरक्षण सोडतही घोषित केली आहे. त्यानुसार, विविध वॉर्डांमधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. मागील सहा महिन्यांपासूनच भाजप आणि शिवसेनेमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. यातील गंभीर प्रकरणांचा मतांवर परिणाम होणार हे निश्चित. कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहेत. या काळात विविध भागातील स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनीही नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. आगामी निवडणुकीत या सेवेचं फळ कार्यकर्त्यांना मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 196 अर्थात वरळी परिसरातील विविध पक्षांनीही मरगळ झटकली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मागील 2017 मधील निवडणुकीत शिवसेनेच्या (Shiv Sena) भगव्याची जादू इथे दिसून आली. भाजपच्या उमेदवाराला दुप्पटीपेक्षा जास्त मतांनी पराभूत करत येथे आशिष चेंबुरकर (Aashish Chemburkar) यांनी विजयाची माळ गळ्यात घातली होती. यंदा मात्र हा वॉर्ड महिला आणि सर्वसाधारण गटात निश्चित करण्यात आल्याने चेंबुरकर यांची संधी हुकलीय. आता शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कोणत्या नेत्याला नगरसेवक उमेदवारीचं तिकिट मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 2017 मधील निवडणुकीनंतरही बराच काळ उलटला आहे. बरीच संकटं राज्यानं, जनतेनं झेलली आहेत. या संकटात ज्या नेत्यानं नागरिकांना मदत केली, त्याचा प्रभाव मतदानावर दिसून येणार हे नक्की.

विद्यमान नगरसेवक कोण?

वॉर्ड क्रमांक 196 मध्ये शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक जिंकली होती. भाजपच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराजित करत त्यांनी नगरसेवकाची माळ गळ्यात घातली होती. आता 2022मधील निवडणुकीतदेखील शिवसेनेची ताकद प्रभावी ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2017 मधील उमेदवारांना किती मते?

  • आशिष रामनाथ चेंबुरकर- शिवसेना- 11306
  • दीपक अशोक पाटील- भाजपा- 5618
  • दशरथ शिवराम नितनवरे- राष्ट्रवादी काँग्रेस- 3731
  • संदीप सुधाकर खऱात- बहुजन समाजवादी पार्टी-1465
  • अॅड. इंद्रजित वसंतराव सुर्यवंशी- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 1112
  • दशरथ दत्ताराम निकम- मनसे- 1551
  • संतोष रघुनाथ कदम- भारिप बहुजन महासंघ- 240
  • NOTA- 384
  • एकूण मतदार- 48,854
  • वैध मते- 25,934

वॉर्डातील महत्त्वाचे भाग कोणते?

वरळी सी फेस, वरळी डेअरी, मुन कॉलनी, पोलीस कँप, वरळी बस डेपो आदी भाग हा वॉर्ड क्रमांक 196 मध्ये येतो.

वॉर्डातील लोकसंख्येचं गणित काय?

मुंबई महापालिका निवडणुकीतील लोकसंख्या पाहता 2011मधील जनगणनेनुसार, या वॉर्डात 54 हजार 639 एवढी लोकसंख्या होती. तर वॉर्डातील अनुसूचित जातींची संख्या 1297 एवढी होती. अनुसूचित जमातींची संख्या 180 एवढी होती. मध्यंतरी कोरोना काळामुळे देशातील जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 2011मधील जनगणनेपेक्षा सर्वच ठिकाणची लोकसंख्या 10 टक्क्यांनी वाढलेली असू शकते.

वॉर्ड आरक्षित की खुला?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा मागील वेळच्या तुलनेत अनेक बदल झाले आहेत. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 196 हा सर्वसाधारण गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच हा वॉर्ड महिलांसाठीही आरक्षित करण्यात आला आहे. त्यानुसार आता या गटातील इच्छुक आता कामाला लागले आहेत. लवकरच विविध पक्षांतर्फे उमेदवारांची नावं जाहीर होतील.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाआशिष रामनाथ चेंबुरकरविजयी उमेदवार
भाजपदीपक अशोक पाटील-
राष्ट्रवादी काँग्रेसदशरथ शिवराम नितनवरे-
काँग्रेसअॅड. इंद्रजित वसंतराव सुर्यवंशी--
मनसेदशरथ दत्ताराम निकम-
अपक्ष / इतर--