मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : देशातील 20 शहरांच्या विकासात केंद्र सरकारने विशेष लक्ष घालण्याचं ठरवलं आहे. या शहरांच्या यादीत मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. त्यासाठी नीती आयोगाने प्लॅन केला आहे. या अंतर्गत या शहरांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम हे नुकतेच मुंबईत येऊन गेले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. यात हा विकास येत्या चार महिन्यात तयार करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. यावरही चर्चा झाली. मात्र केंद्र सरकारच्या या कार्यक्रमावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत आज या निर्णयाचा विरोध केला.
मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहीत पवार यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं. तसंच मुंबईवर अन्याय होऊ देणार नाही, असं म्हटलं. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून माहिती देण्यात आली आहे.
आज नीति आयोगाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार मुंबईला केंद्रशासित करू पहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली आहे. नीति आयोगाकडे मुंबईचा विकास आराखडा राज्य सरकार देणार आहे.
मुंबईकर सावध असले तरी देशातील सध्या चालू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला साथ देण्याचा निर्णय जर राज्य सरकार घेणार असेल तर, त्यांना वेळीच रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईकर जनतेच्या मागे उभी राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, प्रांताध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहीत पवार व मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष धनंजय पिसाळ, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज आंब्रे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, डिजीटल मीडिया रिसर्च अँड कम्युनिकेशन विभाग राज्यप्रमुख नीरज महांकाळ, राष्ट्रीय विद्यार्थी सचिव ॲड. मनोज टपाल, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, अल्पसंख्यांक मुंबई जिल्हाध्यक्ष सोहेल सुभेदार, मुंबई विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रशांत दिवटे, प्रवक्ता अमोल मातेले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आज नीति आयोगाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार मुंबईला केंद्रशासित करू पहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली आहे. नीति आयोगाकडे मुंबईचा विकास आराखडा राज्य सरकार देणार आहे.
मुंबईकर सावध असले तरी देशातील सध्या चालू… pic.twitter.com/oiLsWyYa0F
— NCP (@NCPspeaks) August 31, 2023
आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला जात असेल, तर हे आम्ही सहन करणार नाही, असं म्हटलं.
नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करायचा असे भासवून शहराचे स्वतंत्र अस्तित्व संपवण्यासाठीचा घाट घातला जात असून जर कोणी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यासाठी आज मुंबई महाराष्ट्रात राहावी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही सरकारविरोधी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, जितेन्द्रजी आव्हाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करायचा असे भासवून शहराचे स्वतंत्र अस्तित्व संपवण्यासाठीचा घाट घातला जात असून जर कोणी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यासाठी आज मुंबई महाराष्ट्रात राहावी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान… pic.twitter.com/xJtFqBex5u
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 31, 2023