आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला; धनंजय मुंडे गहिवरले…

| Updated on: Jul 05, 2023 | 5:19 PM

Dhananjay Munde on Ajit Pawar : अजितदादा तुमची नियत साफ आहे, नियती तुमच्या पाठीशी उभी राहिल; धनंजय मुंडे यांचं धडाकेबाज भाषण

आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला; धनंजय मुंडे गहिवरले...
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर बैठक बोलावली आहे. यात बोलताना धनंजय मुंडे गहिवरले. आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झालाअजित दादांनी सगळ्यात जास्त ठेचा खाल्ल्या. त्यांना सगळ्यात जास्त मान खाली घालावी लागली, असं धनंजय मुंडे म्हणाले. अजित दादांवर आतापर्यंत बरीच टीका झाली. त्यांनी किती अपमान सहन केले. पण ते अपमान त्यांनी त्यांच्या सावलीलाही कळू दिलं नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी साहेबांसाठी सगळं सहन केलं, असंही धनंजय मुंडे म्हणालेत.

आज या व्यासपीठावर बोलताना माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, पण माझं मनं रडतंय. अजितदादांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील. पण ते कधीही काहीही बोलले नाहीत. त्यांनी सगळं सहन केलं. अजित दादांना सर्वात जास्त वेदना सहन केल्या आहेत, असं म्हणताना धनंजय मुंडे गहिवरले.

माझ्यावरहील असाच अन्याय झाला. तेव्हा अजित दादा माझ्या पाठीशी होते. पण दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची नियत साफ आहे. त्यामुळे नियती तुमच्या पाठीशी असेल असं धनंजय मुंडे म्हणाले.

अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत एक सूर पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणात अजित पवार यांच्या अपमानाचा मुद्दा समोर आला.

अजित पवार यांच्यासोबत बाहेर निघालेल्या नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

राष्ट्रवादी पक्षासाठी आणि जनतेसाठी ही सगळी मंडळी सकाळी सहा वाजेपासून काम करतात. दादा तर सकाळी लवकर कामाला सुरूवात करतात. ते फक्त पक्ष, पवारसाहेबांचा शब्द, साहेबांनी घालून दिलेला आदर्श, त्याचे विचार यासाठीच काम करतात, असं धनंजय मुंडे म्हणाले.

80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा असं पवार साहेब सांगतात. त्याच पद्धतीने अजितदादा देखील काम करत आहेत, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

आम्ही शिवसेना आणि भाजपसोबत आलो तर लोक म्हणतात तुम्हाला हिंदुत्व मान्य आहे का? त्यांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो तेव्हा मनात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आम्हाला दिसतं. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो, असं धनंजय मुंडे म्हणालेत.