गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर आज दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आधी ठाकरे गटाने शिंदे गटावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. रावण हा अहंकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. आज दसरा मेळावा त्या रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. 2024 च्या दसरा मेळाव्यावेळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्यकर्ते बसले असतील. पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली आहे. मोहन भागवत लोकशाही मानत नाहीत का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? मोहन भागवत यांना लोकशाहीचे आम्ही संरक्षक मानतो. या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का? मी मोहनराव भागवतांना एक सांगू इच्छितो की, बाळासाहेब देवरस सरसंघ चालक हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. तेव्हा देखील भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. तेव्हा भारतीय जनता पक्ष देखील होता. त्यांनी हुकूमशाहीचा पराभव केला, असं संजय राऊत म्हणाले.
मोहन भागवत यांना सांगण्याची गरज नाही. बहुदा त्यांना इतिहास माहीत असावा. या त्यांनी अडवाणींच्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात सर्व घटना उल्लेख केलेला आहे. ते पुस्तक मी मोहनराव भागवत यांना पाठवत आहे, असंही राऊत म्हणाले.
महाराष्ट्र हा ड्रग्सचा हब बनवला जात का? देशात लहान मुलांपर्यंत ड्रग्स पोहचलं जातंय. त्या रावणांकडून त्याचा बंदोबस्त करा. पंचवटीमध्ये सर्वात जास्त ड्रग्स व्यापार सुरू आहे. हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती नाही का? पैठण, नागपूर, नाशिक, विदर्भ अशा ठिकाणी ड्रग्स मिळते मुंबई पुणे मध्ये व्यापार सुरु आहे, कोट्यवधींचा बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा मात्र ड्रग्स पिऊन श्रीराम बोलणार नाही .ड्रग्सचा रावण आजूबाजूला फिरत आहे आणि तुम्ही श्रीराम बोलत आहात. त्या रावणाला संपवा त्यानंतर रामाचे नाव घ्या, असं म्हणत राज्यातील ड्रग्ज रॅकेटवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.