छत्रपती संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये अख्ख राज्य मंत्रिमंडळ दाखल झालं आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांसाठी रेड कारपेट टाकण्यात आलंय. 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75 वं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यात मराठवाडा आणि संपूर्ण राज्यासाठी मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या या बैठकीवर भाष्य केलंय. राज्यात सध्या पाऊस होत नाहीये. अशात सरकारने दुष्काळ केलेला नाही. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं म्हटलंय. तशी बातमी पाहिली. तसं असेल तर त्याचं मी मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनंही पूर्ण केली जातील, अशी आशा व्यक्त करतो, असं जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रिमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.
पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे.
शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं.
इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही.
दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.
मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.
पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 16, 2023