मुंबई : शरद पवारसाहेबांनी कधीही हिंदू समाजाची बाजू घेतली नाही. जेवढी ते मुस्लिम समाजाची बाजू घेतात. तेवढी बाजू ते हिंदू समाजाची कधीही घेताना मला दिसले नाही, म्हणून मला असं वाटलं की औरंगजेब परत जन्मला की काय?, असं म्हणत भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
औरंगजेबचा पुनर्जन्म झाला की काय असं मी बोललो त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? औरंगजेब पण मुस्लिम धर्माला बनवण्यासाठी जे शक्य होतं ते सगळं करायचा, हेही तसंच वागतात, असं म्हणत निलेश राणे यांनी पवारांवर टीकास्त्र डागलंय.
मला असं वाटतं शरद पवारसाहेब फक्त आई वडिलांनी दिलेल्या नावाने हिंदू आहेत. त्यामुळे त्यांनी धर्मांतर करावं. मुस्लिम समाजामध्ये त्यांनी जावं. आम्हाला हे धर्मांतर चालेल, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण? फोटो दाखवला त्यातून काय परिणाम होतो? कुणाला पडलंय त्याचं?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय यावरून निलेश राणे यांनी टीका केली आहे.
जेव्हा 1993 ला बॉम्ब ब्लास्ट झाला. तेव्हाच्या शरद पवारांच्या एक वक्तव्य आहे की एक बॉम्ब ब्लास्ट वाढवून दाखवला. कोणाला वाचवण्यासाठी बॉम्ब ब्लास्ट वाढवला, मुस्लिम समाजाला?, असा सवालही निलेश राणे यांनी विचारला आहे.
रामनवमी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला दगडफेक होती. मुस्लिम समाजाच्या लोकांना कळ काढतात हे अनेक पोलीसातील तक्रारींमध्ये आलेलं आहे. पण पवारसाहेब कधी त्यांना आवाहन करताना ऐकायला मिळणार नाहीत, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असं ट्विट निलेश राणे यांनी काही वेळा आधी केलं. त्यावर आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023
निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असे बोलणे हे लज्जास्पद आहे. तसेच यावरून त्यांची संस्कृती दिसते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
निलेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. कॅमेरासमोर थुंकणारा माणूस आज आम्हाला संस्कृती शिकवत आहे. ज्याचं समाजामध्ये काहीही स्थान नाही, अशा माणसाने आमच्यावर टीका करू नये. शरद पवारसाहेब कधीही हिंदू धर्माच्या संरक्षण करताना दिसत नाहीत. संजय राऊत टुकार माणूस आहे. त्यांनी माझ्यावर टीका करण्याने मला काही फरक पडत नाही, असं निलेश राणे म्हणालेत.