मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील महत्वाचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. इंडिया आघाडीला हरवणं कठीणचं नव्हे, अशक्य आहे , असं खासदार संजय राऊत म्हणालेत. आम्ही देशासमोर लवकरच ॲक्शन प्लॅन घेऊन येणार आहोत. भाजप आमच्या बैठकीला घाबरली आहे. त्यामुळेच महायुतीची बैठक घेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आमची बैठक सुरु आहे. जसं जशा या बैठका होत आहे. तसं तसं चीन घाबरतंय. येत्या काळात ते दोन पावलं मागे सरकतील, असं राऊतांनी म्हटलंय.
2024 च्या निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकणार आहे. लोकांचं आम्हाला समर्थन आहे. इंडियाला हरवणं मुश्कीलच नव्हे तर नामुम्किन आहे. येत्या काळात आमचंच सरकार सत्तेत येणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. आज संध्याकाळी इंडियाची बैठक सुरु होईल. उद्यापर्यंत ही बैठक चालेल. या बैठकीतून आम्ही देशासमोर मोठा अॅक्शन प्लॅ घेऊन येऊ, असा विश्वास संजय राऊत म्हणालेत.
इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये पोस्टर वॉर सुरु असल्याची चर्चा होतेय. यावर बोलताना इंडियाच्या नेत्यांमध्ये कोणतंही वॉर नाही, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी हे देशातील निर्विवाद नेता आहेत. त्यांचं नेतृत्व आम्हा सर्वांना मान्य आहे. त्यांना देशभरातील लोकांचं समर्थन आहे. त्यामुळे इंडियाला हरवणं आता शक्य नाही. कुणाच्याही बापाला ते जमणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
भाजप- शिंदे गटाने ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक घेऊ द्या नाही तर चांद्रयान खाली बोलावून त्यात बसून चंद्रावर जात बैठक घेऊ द्या. तरीही काहीही होणार नाही. आता आमच्या आघाडीचा पराभव करणं कुणालाही शक्य नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.
इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक होतेय. या बैठकीला देशभरातील नेते दाखल झालेत. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होतेय. आजच्या या बैठकीकडे देशाचं लक्ष आहे.