गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे. तो हा लवाद पालन करत असेल लवाद हा सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करत आहात. सार्वभौमत्व म्हणजे काय चोरांना संरक्षण देणं चोरांच्या सरदारांना राजकीय संरक्षण देणे म्हणजे विधिमंडळाचा किंवा संसदेचे सार्वभमत्व नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
राहुल नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाचा स्वतःच्या कायद्याच्या पुस्तकातला मानत नाहीत. ते स्वतःचा पर्सनल लॉ मानतात. पण त्यांच्या पर्सनल लॉवर कायदा चालत नाही. जे आम्ही सांगतोय तेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. यांच्या डोक्यावर लोहाराचे हातोडे पडून देखील त्यांचे डोके ठिकाणावर येत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलंय.
सर्वोच्च न्यायालयाने काल एक निकाल दिला. समलिंगी विवाहाला मान्यता नाही तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. त्यांच सरकार हे त्याच पद्धतीचा सरकार आहे .जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. दोन गद्दरांचे गट एकत्र आले तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणतील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केली आहे. राजकीय दृष्ट्या मी बोलतो, असंही संजय राऊत म्हणालेत.
नागपूरमध्ये जे घडलेला आहे ते स्पष्ट दिसत आहे. पोलिसांना धक्काबुक्की झालेली आहे. गृहमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्याच्या आवारात घडलेलं आहे. हा व्हिडिओ खोटा आहे का? असं तुम्ही म्हणत आहात का कुणाला वाचवत आहात? कोणत्या गुन्हेगारांना वाचवत आहात. छातीला कमळ लावलं आणि त्याने खून केला तरी मग तो महात्मा काय?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.