मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हिंदूंना अस्वस्थ करणारी घटना काल मातोश्रीवर घडली. ज्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होतात. त्याच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. हे अतिशय निंदनीय आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? हे त्यांनी सांगावं. ज्या हिंदूंचा जीव गेला त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी काल केलं. या भेटीने हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, असं म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. इंडिया बैठकीच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर ममता बॅनर्जी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे.
रोहिंगे आणि बांगलादेशी यांनी काल दिवाळी साजरी केली असेल. जर चुकून मुंबईची सत्ता ठाकरेंजवळ गेली. तर मुंबईत हिंदू कमी दिसतील आणि रोहेग्यांचीच मुंबई गर्दी होईल. संजय राऊत राहुल गांधी यांच्यासोबत वॅलेंटाइन डे साजरा करेल. काय योग्य आणि काय अयोग्य हे जयंत पाटील यांना समजत नसेल. बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी एक वक्तव्य केलं. माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड, म्हणून मला 100 कोटींची ऑफर आली, असं सुनील राऊत म्हणालेत. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत देशी ब्रँड आहे. आम्ही पण वाट बघत आहोत हुकमाचा एक्का बाहेर कधी काढतात ते, असं नितेश राणे म्हणाले.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची झारखंडमध्ये सभा झाली. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओवैसी यांनी घोषणा देणाऱ्यांना टोकलं. यावर नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. असदुद्दीन ओवैसी हा पाकिस्तानचा एजंट आहे. त्यांना भारतात राहायला का द्यायचं? यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्या. भारतात राहायची यांची लायकी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केलीय, असं म्हणत नितेश राणे यांनी ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे.