उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ: भाजपच्या पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे यंदा 53 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपकडून पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लढत झाली. प्रिया दत्त यांनी सुरुवातीला निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगितल्याने त्या मैदानात उतरल्या होत्या.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | पूनम महाजन (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | प्रिया दत्त (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | पराभूत |
सुनील दत्त यांच्या निधनानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांचा विजय झाला होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. पूनम महाजन यांनी 1 लाख 86 हजार मतांनी विजय मिळवला होता.
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. तर वांद्रे पश्चिम आणि विलेपार्लेमध्ये भाजपचे. चांदिवली जागा काँग्रेसच्या खात्यात आहे.