Mumbai North Lok sabha result 2019 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ Mumbai North : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी बाजी मारली. गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.32 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर […]

Mumbai North Lok sabha result 2019 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल
उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी
Follow us on

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ Mumbai North : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी बाजी मारली. गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.32 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात फाईट झाली.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनागोपाळ शेट्टी (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीउर्मिला मातोंडकर (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

या मतदारसंघात एकेकाळी भाजपचे राम नाईक पाच वेळा खासदार होते. त्यांना अभिनेता गोविंदाने त्यांचा पराभव करुन इथे काँग्रेसचा झेंडा फडकावला होता. नंतर काँग्रेसकडूनच संजय निरुपम इथे जिंकले. मग 2014 मध्ये मोदी लाटेत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांच्यावर विक्रमी विजय मिळवला.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दबदबा आहे. इथे बोरीवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोपमध्ये भाजप, मागाठणेमध्ये शिवसेना तर मालाड पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे.