उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ Mumbai North West : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा गजानन कीर्तीकर यांनीच बाजी मारली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे यंदा 54.71 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यात लढत झाली.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | गजानन कीर्तिकर (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | संजय निरुपम (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | पराभूत |
उत्तर पश्चिम मुंबई लोक सभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. इथे पूर्णत: शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे. गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे आमदार आहेत. जोगेश्वरी पूर्व, डिंडोशी आणि अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत.
2014 च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. यंदा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून गजानन किर्तीकर यांना आव्हान दिलं होतं.