मुंबई – खासदार निलेश नारायण राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) या बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे राणे बंधुंच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून महविकास आघाडी आणि भाजप यांच्यात राजकीय वातावरण अधिक तापलंआहे. भाजपकडून भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीकडून केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर करून आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
नेमकं तक्रारी काय आहे
राणे बंधू नितेश आणि निलेश यांनी जाणीव पूर्वक समाजात तेड निर्माण केला आहे, त्यांनी शरद पवार यांचे आतंरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसार माध्यमांमध्ये वक्तव्य करत आहेत. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य़ करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला दाखल केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना यांसंदर्भातला पुराव्याचा पेनड्राव्ह दिला आहे.
शरद पवारांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवणार
संजय राऊत आणि किरीट सोमय्यांनी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात राजकारण तापायला सुरूवात झाली. त्यानंतर नवाब मलिकांना दाऊदच्या जागा खरेदी प्रकरणात ईडीने ताब्यात घेतले. तेव्हा दोन्ही पक्ष आमणे सामने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांच्याघरी आयकर विभागाने छापे घातले. अजून अनेक ठिकाणी छापे पडणार असल्याचे किरीट सोमय्या मीडियाला वारंवार सांगत आहेत. नवाब मलिकांचा राजीनामा अद्याप घेतला नसल्याने राणे बंधुंनी थेट शरद पवारांवरती टीका करायला सुरूवात केली आहे. तसेच शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे असं वक्तव्य केल्याने राणे बंधुंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.