मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : दंगली घडवणं हे भाजपचं कटकारस्थान आहे. भाजप हे महाराष्ट्रामध्ये दंगलीचं राजकारण करत आहे. यापूर्वी राज्यात सात दंगली घडल्या आहेत. हे भाजपंचं कटकारस्थान आहे. राज्यातील दलित आणि मुस्लीम बांधव उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या बाजुने येत आहेत. ते मविआच्या बाजुने येऊ नयेत म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात आहे, असं ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. त्याला आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत खैरे यांचं वय वाढलं आहे. पण त्यांची राजकीय अक्कल काही वाढली नाही. ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. देशात दलित आणि आदिवासींना मानसन्मान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. त्यांना खासदारकी हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या चरणी निष्ठा दाखविल्याशिवाय त्यांचं भलं होणार नाही. त्यामुळे ते बोलत आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी दंगली घडवल्या आहेत. मारझोड , हाणामाऱ्या करून जिंकलात. नैतिकता नाही. संभाजीनगरच्या ज्या निवडणुका ते जिंकले त्यापुर्वी जंगली घडवण्याचं काम चंद्रकांत खैरे यांनी केलंय. नाकाने कांदे सोलण्याचं काम करू नये, असं म्हणत दरेकर यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केलीय.
राज्यात सध्या ईडीचं सरकार असल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावर ई म्हणजे एकनाथराव शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे दोघेही विकासाचे राजकारण करतात आणि विकासासाठी इतर जे नेते आहेत ते आमच्या पक्षात येत आहे.शरद पवार वैफल्यग्रस्त, भेदरले आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांनी पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढू असं म्हटलं आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय ईशान्य मुंबई लोकसभा त्यांनी लढवायची की शिवसैनिकांनी लढवायची हे आधी निश्चित करावा. त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी एखाद्या साधा शिवसैनिकाला खासदारकीला उभं करावं. उमेदवार मिळाला नाही तर होताना उगाच राहावे लागेल. पण त्यांच्या डिपॉझिट जप्त होईल, असं दरेकर म्हणालेत.
2024 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे, अशातच NDA आणि ‘INDIA’ आघाडीकडून विजयाचा दावा केला जात आहे. प्रवीण दरेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2024 या देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील आणि इतरांचा डिपॉझिट जप्त होईल, असं दरेकर म्हणालेत.