राहुल गांधी यांच्यासारखंच शरद पवारांसोबतही तसंच घडणार; रोहित पवार यांनी व्हीडिओ शेअर करत केलं मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 06, 2023 | 12:29 PM

Rohit Pawar Tweet on Sharad Pawar : तुमच्यावर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता, एवढं सगळं दिलं... अजून काय पाहिजे?; रोहित पवार यांचा दिलीप वळसे पाटलांना थेट सवाल

राहुल गांधी यांच्यासारखंच शरद पवारांसोबतही तसंच घडणार; रोहित पवार यांनी व्हीडिओ शेअर करत केलं मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागला गेली आहे. तसंच पवार कुटुंबाचेही दोन भाग झालेत. अशात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार विरूद्ध अजित पवार अशी सध्याची स्थिती आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत.

आज रोहित पवार यांनी राहुल गांधी यांचा तेलंगणातील एक व्हीडिओ शेअर करत रोहित पवार यांनी शरद पवार यांना देखील असाच लोकांचा प्रतिसाद मिळेल असं म्हटलं आहे. शिवाय BRS पक्षावरही टीका केली आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

लोकांनी निवडणूक हातात घेणं म्हणजे काय याची ही झलक आहे.. BRS पक्ष महाराष्ट्राकडे लक्ष देत असताना त्यांच्या स्वत:च्या तेलंगणा राज्यात मात्र लोकांनी राहुल जी गांधी यांना अक्षरशः डोक्यावर घेतलंय…. आणि लवकरच महाराष्ट्रात साहेबांच्याबाबतही असंच चित्र दिसेल…, असं रोहित पवार म्हणालेत.

तसंच राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही रोहित पवार यांनी प्रश्न विचारला आहे. वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या पदांची यादीच रोहित पवार यांनी शेअर केली आहे. एवढं सगळं दिलं, अजून काय पाहिजे?, असं रोहित पवार म्हणालेत.

रोहित पवार यांचं ट्विट

मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती.
असो!
प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?

तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी?