एरवी कुणालाही किंमत न देणारे पंतप्रधान मोदी नाइलाजाने ‘एनडीए’ची मोट बांधतायेत; सामनातून निशाणा

| Updated on: Jul 20, 2023 | 8:31 AM

Saamana Editorial on PM Narendra Modi : सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; म्हणाले, 'इंडिया' नक्कीच जिंकेल! हुकूमशाही आणि मनमानीचा पराभव होईल!

एरवी कुणालाही किंमत न देणारे पंतप्रधान मोदी नाइलाजाने एनडीएची मोट बांधतायेत; सामनातून निशाणा
Follow us on

मुंबई | 20 जुलै 2023 : 18 जुलैला राजधानी दिल्लीत NDA ची बैठक पार पडली. त्याच दिवशी कर्नाटकच्या बंगळुरुत विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला. एरवी कुणालाही किंमत न देणारे पंतप्रधान मोदी नाइलाजाने ‘एनडीए’ची मोट बांधतायेत, असं म्हणण्यात आलं आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांची जी बैठक पार पडली यात आघाडीला ‘INDIA’ असं नाव देण्यात आलं. तर ही ‘INDIA’ आघाडी जिंकेल, असा दावा सामनातून करण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा

भाजपला स्वबळावर निवडणुका लढणे कठीण होत आहे. त्यामुळेच त्यांना नाइलाजाने ‘एनडीए’ची मोट बांधून भ्रष्टाचाराचे डाग असलेल्या कलंकितांनासोबत घ्यावे लागले. त्यामुळे राजकीय विरोधकांवर घाणेरडे आरोप करण्याआधी स्वतःच्या आजूबाजूला कटाक्ष टाकावा . 26 राजकीय पक्ष एकत्र येऊन ‘ इंडिया ‘ हा देशभक्तीचा संघ बनवतात . एरवी कुणालाही किंमत न देणारे पंतप्रधान मोदी ‘ इंडिया ‘ विरुद्ध प्रतिकारासाठी उभे राहतात . म्हणजेच ‘ इंडिया ‘ जिंकत आहे , ‘ इंडिया ‘ नक्कीच जिंकेल . हुकूमशाही व मनमानीचा पराभव होईल . बंगळुरू बैठकीचे तेच फलित आहे !

2024 चा खेळ सुरू झाला आहे. मुकाबला तगडा होईल असे एकंदरीत वातावरण निर्माण झालेले दिसते. पाटण्यानंतर सर्व देशभक्त पक्षांनी बंगळुरूमध्ये बैठक घेतली व 26 पक्षांच्या आघाडीला नवीन नाव देण्यात आले ते म्हणजे ‘इंडिया.’ ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ थोडक्यात ‘इंडिया’ अशा जोरदार नावाने ही आघाडी आता ओळखली जाईल.

भारतीय संविधानाच्या ‘अनुच्छेद-1’मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘इंडिया’ म्हणजेच भारत. हा अनेक राज्यांचा एक ‘संघ’ असेल. भारतात अनेक राज्ये, त्यात भाषा, संस्कृती यांची विविधता असली तरी देश एकसंध आहे. त्याप्रमाणेच ‘इंडिया’ हा एकसंध आहे.

‘इंडिया जितेगा भाजप हारेगा’ या गर्जना, घोषणा आतापासूनच ऐकू यायला लागल्या आहेत. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ ही त्यापुढची घोषणा आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने देशात एकतेचा, प्रेमाचा माहौल निर्माण झाला. त्यामुळे ‘इंडिया’चा ‘संघ’ देशात हुकूमशाही नष्ट करून लोकशाही, स्वातंत्र्य यांच्या रक्षणाचे काम करेल.

भ्रष्टाचाराच्या इराद्याने जेव्हा युती बनते तेव्हा ती देशाचे बरेच नुकसान करते.” मोदी यांनी अशा प्रकारे ‘इंडिया’विषयी त्यांचे मन मोकळे केले. मोदी यांनी एक प्रकारे ‘एनडीए’कडेच बोट दाखवले आहे. मोदी यांनी भ्रष्टाचाराची बात छेडली, पण त्यांच्या व्यासपीठावरच भ्रष्टाचाराचा चिखल दिसत होता. कालपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, लुटमारीचे आरोप केले ते ‘एनसीपी’चे नेते मंडळ मोदींच्या मांडीस मांडी लावून बसले होते. शिंदे गटातही सगळे नामचीन भ्रष्ट आहेत, ते शिंदेही ‘एनडीए’च्या मंचावर दिसले.

एनसीपी सोडताना प्रफुल पटेल म्हणाले होते, ”विरोधी पक्षांच्या बैठकीत पाटण्यात गेलो होतो त्यात एक पार्टी अशी होती की, त्यांचा एकही खासदार नव्हता.” पण आता मोदींच्या नव्या एनडीएत 24 पक्ष असे आहेत की, ज्यांचा एकही खासदार नाही. मग आता तेच पटेल तेथे कसे गेले? नव्या ‘एनडीए’त शिंदे व अजित पवारांच्या फुटीर गटास बोलावले. त्यांच्या पक्षाचा फैसला अद्यापि व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तर शिंदे व त्यांचा गटच अपात्र ठरवला आहे. अजित पवार गटाचेही तेच हाल होतील.