हॅलो बाळासाहेब… शब्द देतो, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना आम्ही पुन्हा उभी करू- संजय राऊत

| Updated on: Jun 22, 2023 | 8:04 AM

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray : 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमातून संजय राऊतांचा बाळासाहेब ठाकरेंना फोन; काही तक्रारी, काही आश्वासनं, नेमकं काय म्हणाले? पाहा...

हॅलो बाळासाहेब... शब्द देतो, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना आम्ही पुन्हा उभी करू- संजय राऊत
Follow us on

मुंबई : 21 जून 2022 ला शिवसेना पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. आपल्या समर्थक आमदारांसह भाजपशी हात मिळवणी केली अन् शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झालं. या सगळ्यामुळे शिवसेनेत मात्र दोन गट निर्माण झाले. अशातच ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांचा वारंवार गद्दार असा उल्लेख करण्यात येतो. पण या सगळ्या बंडाची ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला तुम्हाला फोन लावण्याची संधी मिळते. हा फोन काल्पनिक असतो. त्यामुळे तुम्ही हयात असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तीला हा फोन लावू शकता. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी तुम्ही कुणाला फोन लावाल, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊतांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावला. या फोनमध्ये त्यांनी काही तक्रारी केल्या. तर काही आश्वासनं दिली आहेत.

हॅलो बाळासाहेब, तुम्ही आम्हा लोकांना सांगितलं की शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होता. तो धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरला. पण तुम्ही खात्री बाळगा. आमचा कणा अजून मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, असं आश्वासन संजय राऊत यांनी या फोनमध्ये बाळासाहेबांना दिलं.

एक वाक्य तुम्ही नेहमी शिवसैनिकांना सांगायचा की आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. तर सत्ता आपल्यासाठी जन्माला आलेली आहे. असं तुम्ही आम्हाला कायम सांगितलं. ते ध्यानात ठेवून आम्ही वाटचाल करू, असा शब्दही संजय राऊतांनी दिला आहे.

याआधी भाजपचे खासदार नारायण राणे यांना खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, नारायण याला खासदार करायचंय आपल्याला. मी फक्त त्यांचा शब्द पूर्ण केला, असं ते म्हणाले होते.

नारायण राणे यांच्या टीकेलाही संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. हे महाशय खोटं बोलत आहेत. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर त्यांची खासदारकी जाऊ शकते, असं संजय राऊत म्हणालेत.