भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली; संजय राऊत यांचा घणाघात

| Updated on: Jul 02, 2023 | 3:53 PM

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवार यांचा शपथविधी म्हणजे ऑपरेशन लोटसचाच भाग; राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका, संजय राऊत यांचं अत्यंत महत्वाचं ट्विट

भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली; संजय राऊत यांचा घणाघात
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते.  त्यांनाच मंत्रीपदाची शपथ देत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची या सगळ्या घडामोडींवर काय प्रतिक्रिया आहे हे देखील राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांचा पाठिंबा नाही?

जेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर झालं. अजित पवार यांच्यसोबतच्या आमदारांची नावं, फोटो समोर आले तेव्हा शरद पवार यांचा या शपथविधीला पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

अजित पवारांचा शपथविधी हा राजकीय भूकंप नाही.अशा गोष्टी घडणारच होत्या. शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते खंबीर आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

 

काँग्रेसकडूनही ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील आजवरचा सर्वात पलटीबाज आणि खोटारडा माणूस!, असं म्हणत काँग्रेसकडून ट्विट करत घणाघात करण्यात आला आहे.

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे आणि आदिती तटकरे या नेत्यांनी शपथ घेतली आहे.