ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?; संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Nov 04, 2023 | 11:54 AM

Sanjay Raut on CM Eknath Shinde Ajit Pawar : ईडीची कारवाई टाळण्यासाठी तुम्ही सरकार स्थापन केलं, आता सगळ्यात मोठी नौटंकी सुरू आहे, असं संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. सतत धमक्या देण्यापेक्षा एकदा बोलाच..., असं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?; संजय राऊत यांचा सवाल
Follow us on

गणेश, थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 04 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणावरून शिंदेंवर निशाणा साधला आहे. राज्यात होणाऱ्या ड्रग्स तस्करीवर बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचं उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल. रेव पार्टीमध्ये सापाचं विषापासून तयार होणारा अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती नाही?, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एक खासदार या तस्करांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. त्यांना मिठ्या मारल्या जातात आणि त्यांच्या हातून गणपतीची आरती केली जाते. मुख्यमंत्री त्याच्या बाजूला उभे राहतात देशात जे खतरनाक आमचे पदार्थाचा व्यापार चालवतात त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांपर्यंत याला कोणी पोहोचविले. मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील हे खासदार कोण आहेत? त्याचे काय आर्थिक संबंध आहेत मुख्यमंत्र्यांच्या टोळीत कोणाशी आहेत. याचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावं लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीही बोलू नये. मी तोंड उघडलं की तुमची तोंड बंद पडतील, हा त्यांचा नेहमीचा डायलॉग आहे. पण मी तर म्हणतो, आधी तुम्ही तुमचं तोंड उघडा… मग बघू काय ते…, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

माझं अमित शाहा यांना आवाहन आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत एक व्यक्ती पोहोचतो हा मोठा विषय आहे. त्याचा शोध घेतला जावा. ललित पाटील किंवा दुसरा कोणी असो त्याला या राज्यातले मंत्री प्रोटेक्शन देत आहेत. या देशात दाऊदपासून इतरांना प्रोटेक्शन दिलं जात होतं. आता ड्रग्स माफियांना अशा प्रकारचा प्रोटेक्शन दिलं जातंय, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांची ही सगळी नौटंकी आहे. ईडीच्या कारवाई टाळण्यासाठी तुम्ही सरकार स्थापन केलंत. आता सगळ्यात मोठी नौटंकी सुरू आहे, असं म्हणत अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.