काल दिल्लीला गेले अन् आता भीमाशंकरला… मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त!; संजय राऊत शिंदेंवर बरसले

| Updated on: Sep 11, 2023 | 10:46 AM

Sanjay Raut on CM Eknath Shinde : निवडणुकीआधी महाराष्ट्रासह देशात दंगली घडतील; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा मोठा दावा, मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त!

काल दिल्लीला गेले अन् आता भीमाशंकरला... मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त!; संजय राऊत शिंदेंवर बरसले
Follow us on

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या G-20 परिषदेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गेले होते. तिथे त्यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते भीमाशंकर मंदिरात जात दर्शन घेणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

ठाणे बंदबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा… काल G- 20 लासाठी दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र, तंत्र, मंत्र जादू टोना यातच ते अडकलेले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे. त्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला.

साता-यात दंगलसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली? हे सरकारचं अपयश आहे. G-20 त जाऊन पार्ट्या झोडतायत. त्यापेक्षा सरकारनं जालन्यात जावं. मनोज जरांगे पाटलांवर उपोषण करण्याची ही परिस्थिती का आली? त्यासाठी ईडी सीबीआय उपयोगी पडणार नाही. आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काय अर्थ आहे?, असं राऊत म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबन घोलप यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंना पदाचा राजीनामा व्हॉट्सॲप केला. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता, गेल्या 50 वर्षांपासूनते निष्ठावंत सैनिक आहेत. नाशिकमधले निष्ठीवंत सैनिक आहेत. तुम्ही ज्या बातम्या दाखवताय. शेवटी निर्णय पक्ष प्रमुखांचा असतो. त्यांना उमेदवारी दिली होती. पण काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागली. यंदा पुन्हा त्यांच्या नावाचा विचार होणार होता. भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रवेश केला म्हणजे त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्या नाराजीचं कारण काय? घोलप कुटुंबाला सतत काही ना काही मिळत आलं आहे, असं ते म्हणाले.