परवडत नसेल तर कांदा खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे; संजय राऊतांचा दादा भुसेंवर निशाणा

| Updated on: Aug 22, 2023 | 11:29 AM

Sanjay Raut on Dada Bhuse Statement abaut Onion : मंत्र्यांचा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झालाय, संजय राऊत यांची शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर टीका. दादा भुसे यांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार. पाहा नेमकं काय म्हणाले?

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे; संजय राऊतांचा दादा भुसेंवर निशाणा
Follow us on

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : निर्याती संदर्भात जी महाराष्ट्राची स्थिती आहे म्हणजे असं झालं जर तुम्हाला ब्रेड खाता येत नाही. तर तुम्ही केक खा! स्वतः सह्याद्रीवर कांद्यावर ताव मारता यांच्या घरी कांद्याची पोती आहेत. सामान्य माणसाला अंधा आणि भाकरी खायची कांदा हे श्रीमंतांच्या खाण्याचं काम नाही. सामान्य गृहिणींनी कांद्यापासून वंचित राहू नये असे आमचं म्हणणं आहे. हे दीड शहाणे मंत्री पहिले कृषिमंत्री होते. त्यांना या राज्याची स्थिती माहित आहे का याच्यावरती जनता उत्तर देईल, असं म्हणत संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे.

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 40 % कर लावला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. अशातच मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजजय राऊत यांनी निषेध केलाय. कांद्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सरकार गेलं होतं. महाराष्ट्रात सुद्धा आता तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.

दादा भुसे काय म्हणाले होते?

आपण एक लाखांची गाडी वापरतो. मग 10 रुपये जास्त देऊन 20 रुपये देऊन माल खरेदी करावा. 50 पन्नास रुपये जास्त देऊन कांदा खरेदी केल्यास काही फरक पडणार नाही. ज्याला कांदा परवडत नाही. त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडणार आहे? असं दादा भुसे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.

महाराष्ट्रामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रमुख चेहरे आहेत. कोणी कितीही पक्ष फोडले फाटा फूट केली तरी काहीही फरक पडणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही निवडणुका घ्या हे आमचं धोरण आहे, असं म्हणत संजय राऊतांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलंय.

चांद्रयान 3 यान चंद्राच्या जवळ पोहोचलं आहे. हे मिशन आता यशस्वी होण्याच्या काही पावलं दूर आहे. त्यावर बोलताना कुठेही राजकीय श्रेय घेण्याचे कारण नाही. याचे श्रेय वैज्ञानिकांना दिलं पाहिजे. गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हे शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांना प्रधानमंत्री यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी याचं श्रेय घेऊ नये, असं संजय राऊत म्हणालेत.