मुंबई : जागतिक गद्दार दिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं परवानगी द्यावी, अशी माझी संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती आहे. आजचा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेनं जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळानंतर जगातील सर्वात मोठी गद्दार मागच्या वर्षी आजच्या दिवशी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी गद्दारी केली. तो इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्याहून मोठी गद्दारी याआधी झाली नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खसादार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेने या नेत्यांना सगळं काही दिलं. त्याच आईच्या पाठीत खंजीर खुपसत यांनी गद्दारी केली. तर या गद्दारांना जोडे मारण्यासाठी, त्यांचा निषेध करण्यासाठी एक दिवस असावा. यासाठी मी संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेला पत्र लिहिलं आहे. ही लोकांची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज अमेरिकेत जात आहेत. ते युरोमध्येही जाणार आहेत. तर त्यांनीही माझ्या या मागणीचा पाठपुरावा करावा, असं राऊतांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तसं कळवलं आहे. पंतप्रधान युनोमध्ये जाणार आहेत. त्यांना माझं आवाहन आहे. की जसं त्यांनी योगा डे साजरा व्हाला यासाठी प्रयत्न केले तसं यासाठी पुढाकार घ्यावा. कारण महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी त्यांनीही प्रयत्न केलेले आहेत. या गद्दारीत त्यांचंही योगदान आहे. त्यामुळे त्यांना याची तीव्रता लक्षात येत असेल. त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करावा, असं संजय राऊत म्हणालेत.
संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून अनेक दिवस साजरे केले जातात. आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, योगा डे साजरा करतो. तसंच आजचा दिवस हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस आहे. या गद्दारीची दखल जगातल्या 33 देशांनी घेतली असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला वाटतं, जगात अशा घटना घडत असतील पण ही सर्वात भयंकर घटना होती. त्यामुळे या दिवशी गद्दारांना जोडे मारावेत. त्यांचं स्मरण करावं, यासाठी या दिवसाची जागतिक गद्दारी दिवस म्हणून आजचा दिवस साजरा व्हावा, असं राऊतांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 20 जूनला ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. हे पत्र संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. लोक आग्रहास्तव!, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @BJP4India @AUThackeray @unfoundation @UNHumanRights pic.twitter.com/OJ5qu28oY2
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 20, 2023