एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ कृतीवर बोट; संजय राऊत यांचं थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

| Updated on: Jun 20, 2023 | 9:29 AM

Sanjay Raut wrote letter the United Nations : पत्रास कारण की, संजय राऊत यांचं थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र; 20 जून जागतिक गद्दार दिन जाहीर करण्याची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या त्या कृतीवर बोट; संजय राऊत यांचं थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र
Follow us on

मुंबई : आजचा हाच तो दिवस ज्या दिवशी मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत त्यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठली. पुढे गुवाहाटी मग गोवा अन् नंतर मुंबई असा प्रवास करत अखेर शिंदे सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. या सगळ्या घटनाक्रमाला एक वर्ष पूर्ण झालं. याच दिवसाला ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 20 जूनला ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

हे पत्र संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. लोक आग्रहास्तव!, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊतांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नेता आहे. मी भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेचा सदस्य आहे. मुंबईतील मराठी तरूणांच्या हक्कांसाठी हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी 1960 मध्ये सुरू केला होता.

आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 या काळासा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मागच्या वर्षी 20 जूनला आमच्या पक्षातील आमदारांच्या गटाने बंड केलं. 50 खोके दिल्याने आमदारांनी भाजपसोबत हात मिळवणी केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपने त्यांची सगळी शक्ती पणाला लावली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 तर अपक्ष 10 आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला.

मागच्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सूरत गाढली. 12 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या आजारपणाचा या गद्दारांनी फायदा घेतला.

21 जून हा दिवस जसा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच 20 जूनला जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात यावा. जेणे करून या आमदारांची गद्दारी जग लक्षात ठेवेन.

या मजकुराचं पत्र संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे.