Sharad Pawar : अजित पवार यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी…; शरद पवार यांचं मोठं विधान

| Updated on: Oct 05, 2023 | 9:46 AM

Sharad Pawar on Ajit Pawar : भाजपसोबत गेले ते माझ्या पक्षाचे असू शकत नाहीत; शरद पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांच्या बंडाचं कारण सांगितलं. अजित पवार गटाबद्दलची त्यांची भूमिकाही सांगितली. तसंच आपण यापुढे निवडणुका लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वाचा...

Sharad Pawar : अजित पवार यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी...; शरद पवार यांचं मोठं विधान
Follow us on

मुंबई | 05 ऑक्टोबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच या सगळ्या घडामोडींमागे शरद पवार यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. यावर आता खुद्द शरद पवार यांनीच मोठा खुलासा केला आहे.अजित पवार यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही, असं शरद पवार म्हणालेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मोठा खुलासा केला आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, यावरही शरद पवारांनी भाष्य केलं.

अजित पवार हे विरोधी पक्षनेते असतानाही भाजपसोबत का गेले?, असा सवाल वारंवार चर्चेत येतो. यावर शरद पवारांनी भाष्य केलंय. तपास यंत्रणांच्या भीतीमुळे अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा नेमकं काय घडलं यावर शरद पवारांनी भाष्य केलं. माझ्याकडे 6 ते 7 सहकारी आले. सरकारला पाठिंबा न दिल्यास जेलमध्ये जावं लागेल. आमच्यासमोर सध्या दोनच पर्याय आहेत. एकतर भाजपसोबत जाणं किंवा जेलमध्ये जाणं, असं म्हणाले असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

अजित पवार गटातील नेत्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांची नेमकी काय भूमिका असेल, याची वारंवार चर्चा होते. त्यावरही शरद पवारांनी स्पष्ट भाष्य केलं. भाजपसोबत गेले ते माझ्या पक्षाचे असू शकत नाहीत. भाजपविरोधी पक्षांना फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातोय. भाजपने आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सोबत घेतलं, असं शरद पवार म्हणाले.

जेव्हा केव्हा राज्यात काही राजकीय घडामोडी घडतात. तेव्हा त्या घडामोडींमागे शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते. त्याच त्यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर त्यामागे शरद पवार यांचाच हात असल्याची भरपूर चर्चा रंगली. यावर शरद पवारांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. अजित पवारांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता. पक्षातील नेत्यांचंही तसं म्हणणं होतं, असं ते म्हणाले.

राहुल गांधी लवकरच देशातील एक नेतृत्व म्हणून समोर येतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मी या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही. पण काम करत राहणार आहे, असं शरद पवार म्हणाले.