Raj Thackeray : माझी अयोध्या वारी अनेकांना खूपली, राज ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर? ते अनेक जण कोण?

| Updated on: May 22, 2022 | 2:26 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा नेमका कुणाला खूपला, अशी चर्चा आता रंगली आहे.

Raj Thackeray : माझी अयोध्या वारी अनेकांना खूपली, राज ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?  ते अनेक जण कोण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई :  राज्यात सध्या सभा सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यातील भाजपमधलं द्वंद सर्वश्रूत आहे. मुख्यमंत्र्यांची बीकेसीमधील सभा आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली उत्तर सभाही अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे देखील मागच्या काही दिवसांपासून सभा घेतायेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला (Ayodhya) भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan singh) यांनी विरोध केला आणि यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं.  उत्तर प्रदेशसह  देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे आणि विशेषत: राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलं होतं. अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून काही ट्रेन देखील बुक करण्यात आल्या होत्या. दरम्यान, जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला. सभा, संमेलन आणि बाईक रॅली काढून त्यांनी राज ठाकरे यांना जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे बृजभूषण सिंह यांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर राज ठाकरेंनी यांनी यावर आज पुण्यात सभा घेऊ प्रतिक्रिया दिलीय. पण, याचवेळी त्यांनी, ‘माझी अयोध्या वारी अनेकांना खूपली.’असं म्हणत नेमका कुणावर निशाणा साधलाय, अशी आता चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आधी जाणून घेऊया…

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अयोधा दौरा रद्द होण्याच्या मुद्दयावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, माझा अयोध्या दौरा रद्द झाल्यानं काही लोकांना वाईट वाटलं काहींना आनंद झाला. काही लोक कुत्सित बोलत होते. त्यामुळे दोन दिवसांचा मुद्दाम बफर दिला. काय बोलयाचं ते बोला. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र आणि देशाला सांगेल. ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहिती मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. एक वेळ चाललं की हा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकलं नाही पाहिजेत. या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला,’ असं म्हणत राज ठाकरेंचा अयोध्या दौरा नेमका कुणाला खूपला, असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?

राज ठाकरेंच्या दौऱ्याला सर्वात आधी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. उत्तर प्रदेशात बृजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला. सभा घेतल्या, पत्रकार परिषदाही घेतल्या. मात्र, आज राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील काही नेत्यांना देखील यात लक्ष्य केलंय. ते म्हणाले की, ‘हा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकलं नाही पाहिजेत. या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला,’ यावरुन त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांवर देखील संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील हे नेते कोण आहे, कोणी नेमकी रसद पुरवली, याचं उत्तर कधी मिळतं, ते पाहणं महत्वाचं ठरेलं.