मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar farm bill) यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत भाष्य केलं. कृषी कायद्याबाबत (new agriculture bill) आज राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar farm bill) म्हणाले, “आज कृषी कायद्याबाबत (agriculture bill) प्राथमिक चर्चा होत आहे. एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. माझी वैयक्तिक भूमिका महाविकास आघाडीची नाही” (My personal opinion is not that of Mahavikas Aghadi said Ajit Pawar)
“कृषी कायद्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही केंद्राला सांगितलं चर्चा करा. ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा. काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. बिल रद्द करा असं शेतकरी संघटनांचं मत आहे. महाविकास आघाडी सरकारने या बिलाविरोधातील आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे. आज प्राथमिक चर्चा होणार आहे. आज काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा. सगळ्यांशी चर्च करु. मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही” असं अजित पवारांनी नमूद केलं.
दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे. ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी नमूद केलं.
साखरप्रश्नाबाबत अजित पवार म्हणाले, “310 लाख टन साखर तयार होईल असा अंदाज आहे. तेवढी साखर परदेशात निर्यात केली. अनुदान जाहीर केलं. जो साखरेचा दर 31 रुपये ठरवला तो वाढवावा , यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 31 रुपये दर वाढवावा”
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येत आहे. आमचा अंदाज आहे त्यात काही मदत होईल, किती होईल सांगणे उचित होणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
हायकोर्टाने कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आज पाच वाजता MMRDA ची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावेळी याबाबत चर्चा होईल, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा
महाविकास आघाडीचं ठरलं ! भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !