खासदार दिलीप गांधींचे चिरंजीव नगरमधून अपक्ष लढणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

अहमदनगर : भाजपने नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं आहे. तिकीट कापल्यामुळे दिलीप गांधी नाराज असतानाच त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी अपक्ष लढणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आलंय. दिलीप गांधी यांचा उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्यात ते आपली राजकीय भूमिका जाहीर करतील. यानंतरच नगर जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपने दिलीप गांधी […]

खासदार दिलीप गांधींचे चिरंजीव नगरमधून अपक्ष लढणार?
Follow us on

अहमदनगर : भाजपने नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं आहे. तिकीट कापल्यामुळे दिलीप गांधी नाराज असतानाच त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी अपक्ष लढणार असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधाण आलंय. दिलीप गांधी यांचा उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्यात ते आपली राजकीय भूमिका जाहीर करतील. यानंतरच नगर जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपने दिलीप गांधी यांचं तिकीट कापून काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना तिकीट दिलंय. दोन टर्मपासून खासदार असलेले दिलीप गांधी यामुळे नाराज आहेत. त्यातच त्यांच्या मुलाने आता बंडखोरीचं हत्यार उपसल्याची माहिती आहे. पण यावर दिलीप गांधी आता कार्यकर्ता मेळाव्यातूनच राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

नगर दक्षिण मतदारसंघ खरं तर आघाडीचा बालेकिल्ला होता. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या मतदारसंघात आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून ते खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवर ते तरंगले. मात्र यंदा त्यांची धोक्याची घंटा अनेक दिवसांपासून वाजत होती. तर भाजपमध्येच गांधींना मोठा विरोध सुरू होता. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीचाच दिलीप गांधींना मोठा फटका बसलाय.

विशेष म्हणजे नगर महापालिका निवडणुकीतही दिलीप गांधींना पक्षाला फार मदत करता आली नव्हती. स्वतःचा मुलगा आणि सूनेचाच महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे महापालिकेत पराभव झालेले सुवेंद्र गांधी आता लोकसभा लढणार असल्यामुळे सध्या तरी नगरमध्ये राजकीय चर्चा रंगल्या आहेत.